साईकिरण टाइम्स ब्युरो, 31 मे 2020
घोडेगाव (दादा दरंदले) नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे विरभद्र सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज रविवार दि. 31 मे रोजी 295 वी जयंती साजरी करण्यात आली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अगदी साध्या पद्धतीने मोजक्याच सदस्यांनी उपस्थित राहून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत जयंती साजरी केली.
दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात जयंती महोत्सव साजरे केले जातात. पण यावर्षी कोरोना (कोविड 19) महाभयंकर महामारीने जगभर थैमान घातले आहे. देशात सर्वञ हाहाकार माजला असून कोरोनाच्या संसर्गजन्य परीस्थितीमुळे गेली दोन अडिच महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा (कोविड 19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत प्रतिष्ठानच्या मोजक्याच सदस्यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विरभद्र सामाजिक प्रतिष्ठानचे श्री.पंकज लांभाते , शिवाजी ईखे , रामदास ढवाण , अशोक जाधव, भाऊराव दातीर आदी उपस्थित होते.