साईकिरण टाइम्स ब्युरो, 31 मे 2020
सोनई (दादा दरंदले) नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी नामदार शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेवासा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता कोविड १९ साठी एक लाखाचा निधी देण्यात आला.
नेवासा पंचायत समितीचे सभापती व कृषी पदवीधर रावसाहेब कांगुणे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम कृषी सेवा केंद्र चालकांनी राबविला. सोनई येथील नामदार गडाख यांच्या निवासस्थानी सौ.सुनीताताई गडाख यांच्या उपस्थितीत एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश नेवासा पंचायत समितीचे सभापती व कृषी पदवीधर रावसाहेब कांगुणे व जिल्हा फर्टिलायझर असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश सोनवणे यांच्या हस्ते तहसीलदार रुपेश सुराणा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
या उपक्रमाचे कौतुक करून सौ सुनीताताई गडाख यांनी कृषिसेवा केंद्र चालकांचे आभार मानले. यावेळी कृषी केंद्र चालक संघटनेचे ,किशोर नवले,विजय चोरडिया,किशोर भणगे,प्रविण सावंत,मनोज हारदे,प्रविण चंगेडीया,अशोक दरंदले,बाळासाहेब सांगळे उपस्थित होते.