उक्कलगाव : प्रवरा परिसरातील उक्कलगाव, तालुका श्रीरामपूर येथील सुभाष थोरात यांच्या फ्लोअरमिल दुकानात धान्य दळून नेण्यासाठी नियमांचे पालन होत आहे. ( छाया : भरत थोरात)
उक्कलगाव |प्रतिनिधी | लाॅकडाऊनमुळे अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत अशा कठीण परिस्थितीत ग्रामीण भागातील पिठाची गिरणी व्यवसायाला अच्छे दिन आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव व लोकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील लोकं आपल्या मुळ गावी परतले आहेत. त्यामुळे साहजिकच कुटुंबातील सदस्य संख्या वाढली आहे.
शहरी भागातील लोकांना लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुट्टी मिळाली आहे त्यामुळे शहरात स्थलांतरित झालेले नागरिक, शालेय विद्यार्थी,आपल्या मुळ गावाकडे परतले आहे त्यामुळे साहजिकच प्रत्येक घरात किमान दोन किंवा तीन असणारी सदस्यांची संख्या अधिक वाढली आहे ग्रामीण भागातील हॉटेल्सही बंद असल्याने घरीच जेवणाचे वेगवेगळे नियोजन आखले जात आहे. वाढदिवस आदींसह अनेक प्रकारचे सण घरीच साजरे करण्यात येत आहे त्यासाठी लागणारे सर्वच खाद्य पदार्थही घरच्याघरी बनविले जात आहे अश्या पद्धतीने घराबाहेरील पाटर्यांही बंद होऊन घरीच पदार्थ बनवले जात आहे पापड कुरड्या शेवया अश्या प्रकारेचे मोठ्या प्रमाणावर पिठाची गिरणीवर दळुन देण्यासाठी मागणी वाढली आहे. गहु, बाजरी,ज्वारी, हरबरा डाळ आदी दळून नेण्यासाठी सोशल डिस्टन्सींगचे पालन करत पिठाच्या गिरणीत येणार्या धान्यातही लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे एकंदरीत पश्चिम भागातील फ्लोअर मिल व्यवसायाला अच्छे दिन आल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
लाॅकडाऊनच्या होण्याअगोदर सरासरी 2 पोते धान्य दळण्यासाठी येत होते. मात्र, लाॅकडाऊन झाल्यापासूनच त्यातच अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे 2 पोत्यापेक्षा अधिक धान्य दळण्यासाठी गिरणीत येत आहे. यामध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब लोकांची संख्या अधिक असल्याने त्यांनाही दिलासा मिळाला आहे. विशेषत: ग्राहकांचे मोबाईल नंबर घेऊन दळण दळून झाल्यासंबधीतच मेजेसच दिला जात आहे. त्यामुळे गिरणीवर गर्दी न होता सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.
- सुभाष वसंत थोरात, फ्लोअर मिल व्यावसायिक, उक्कलगाव, ता. श्रीरामपूर.