Nevasa : लोकवस्तीत वाढला बिबट्यांचा वावर ; बेल्हेकरवाडी येथे झाडांवर आढळला मृत बिबट्या


साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 एप्रिल 2020
सोनई (दादा दरंदले) नेवासा तालुक्यातील  बेल्हेकरवाडी येथे शनीवारी ( दि 25)  रोजी शेतात  सकाळी साडेसात वाजता शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास दुरून पाहिले असता झाडांवर वन्य प्राणी लटकला आहे हे लक्षात येताच त्यांनी तातडीने सावध होत आजूबाजूच्या शेतकरी व नागरिकांना याची कल्पना दिली. सर्वानी खात्री केली असतात सदर प्राणी बिबटया असून मृत झालेला आसल्याचे आढळून आले.

               दरम्यान, तात्काळ शेतकऱ्यांनी नेवासा येथे वनविभागाचे वनपाल दशरथ झिंजुर्डे नेवासा यांना कल्पना दिली ते तातडीने 9.30 वाजता घटनास्थळी सर्व टीमसह हजर झाले व त्यांनी पाहणी केली असता पायात रानडुकरे पकडण्याचा खटका(आकडा) पायात गुंतल्यामुळे घाबरलेला बिबट्या सदर खटका ओढत आसरा शोधत  त्यातून जखमी झालेला पाय काढून घेण्याचा प्रयत्न करत सदर जांभळीच्या झाडांवर मध्यरात्रीच्या दरम्यान चढला असेल व पायातून खटका काढून घेण्याच्या प्रयत्नांत त्याचा पाय झाडात अजून खोलवर गुंतला व त्यातच त्याचा मृत्यू झाला असेल असा अंदाज वनपाल  व ग्रामस्थांनी  व्यक्त केला.सदर बिबट्या नर होता व त्याचे वय अंदाजे एक ते दीड वर्ष होते सदर बिबट्याचे शवविच्छेदन करून लोहोगाव ता नेवासा येथील वनविभागाच्या नर्सरीमध्ये दु 2.30 वाजता आग्नीदहन करण्यात आले.ज्ञानदेव रंगनाथ बेल्हेकर बेल्हेकरवाडी ता नेवासा  यांच्या गट नंबर 218 या क्षेत्रात सदर बिबट्या आढळून आला.बेल्हेकरवाडी,सोनई,वंजारवाडी,पानसवाडी,कांगोनी,हिंगोणी ,शनीशिंगणापुर येथे ऊस क्षेत्र व उजव्या कालव्याचे पाणी असल्याने थंड प्रदेश असल्याने अनेक बिबटे येथे आश्रयास आहेत.अनेकांना त्यांचे लोकवस्ती परिसरात दर्शन झाले आहे अनेक शेळ्या,कुत्रे यांना या बिबट्यांनी फस्त केले आहे त्यामुळे  भविष्यात लोकवस्तीत घुसून बिबट्यांनी नागरिकांवर हल्ले करू नये व  म्हणून या परिसरातुन नेहमी वनविभागास पिंजरे लावण्याची मागणी केली जाते परंतु नेवासा तालुक्यात 129 गावांची संख्या व सर्वाधिक उसाचे क्षेत्र असल्याने मोठ्या प्रमाणावर बिबटे व त्यांची पिल्ले आढळत असलेल्या तालुक्यात अवघे 7 पिंजरे आहेत व  ते पिंजरे वाहून नेण्यासाठी वाहन नाहीत त्यामुळे वन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना नेहमी जनतेच्या रोषास सामोरे जावे लागते. म्हणून वन विभागाच्या वतीने नेवासा तालुक्यात वाढीव 7 ते 8 बिबटे पकडण्याचे पिंजरे व त्यांची वहातुक करण्यासाठी वाहन उपलब्ध करण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.अन्यथा भविष्यात जर बिबट्याने लोकवस्तीत हल्ला केला व काही दुर्घटना घडली तर त्यास सर्वस्वी वनविभाग कारणीभूत असेल अशी चर्चा नागरिकांत आहे.


नेवासा तालुक्यात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्याचा वावर सर्वत्र आहे सध्या उपलब्ध पिंजरे संख्येने कमी आहेत व ते वाहून नेण्यास वाहन नाही म्हणून वाहन मागणी व पिंजऱ्यांची मागणी वरिष्ठांकडे केली आहे.नागरिकांना कोठे बिबट्या व इतर हिंस्र वन्यप्राणी दिसल्यास त्यांनी आम्हाला तात्काळ पूर्वकल्पना द्यावी आम्ही सर्वोत्तपरी सहकार्य करू.
         - दशरथ झिंजुर्डे, वनपाल नेवासा

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post