साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 एप्रिल 2020
टिळकनगर (वार्ताहर) कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आज गोरगरीब जनतेला उपासमारीची वेळ आली असल्याने श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील गरजू नागरिकांसाठी दत्तनगर सामाजिक प्रतिष्ठानाच्या वतीने अन्नदानाचा उपक्रम चालू केला आहे.
दत्तनगर परिसरातील नागरिक हे मोलमजुरी करणारे असल्याने या लोकांना लॉकडाउनचा मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याने गेल्या एक महिन्यापासून कामकाज ठप्प आहे. या नागरिकांना आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. हीच जाणीव लक्षात घेता येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून दत्तनगर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अन्नदानाचा निर्णय घेतला आहे.
या अन्नदानास दत्तनगर परिसरामधील अनेक दानशूर लोक मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहे.जोपर्यंत लॉकडाउन चालू आहे तोपर्यंत अन्नधान्याचा उपक्रम चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे तसेच परिसरातील गरजू नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्तनगर सामाजिक प्रतिष्ठानचे सरपंच सुनील शिरसाठ, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, हिरामण जाधव, सुरेश शिवलकर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, साहेबराव हांडे, संतोष निकम, विश्वास भोसले, बाबासाहेब दुशिंग, कैलास पगारे, राजेंद्र गायकवाड, सुनील संसारे, रामदास रेने, प्रतिक गायकवाड, शाहजान बागवान, अरुण वाघमारे, अजय शिंदे आदींनी केले आहे. या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे व खादी ग्राम उद्योगचे अध्यक्ष प्रेमचंद कुंकलोळ हे मार्गदर्शन करीत आहे.