साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 एप्रिल 2020
नेवासा | नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे शनिवार दि 25 रोजी मध्यरात्री 2 वाजता घोडेगाव येथील मेन पेठेत असलेल्या वर्धमान ज्वेलर्स हे सराफी दुकान चोरट्यांनी फोडून चोरी केली. या कारवाईत अहमदनगरसह, बीड, लातूर, अंबाजोगई, माजलगाव, जालना औरंगाबाद, नांदेड, अमरावती याठिकाणी गंभीर स्वरपांच्या गुन्ह्यांची नोंद असलेला कुख्यात गुन्हेगार सिकंदर अख्तर सय्यद तसेच सराईत गुन्हेगार शंकर तान्हाजी जाधव (दोघेही रा.बीड) यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. तर यांच्यासह राहुल साहेबराव वैरागर, बाळू दशरथ गायकवाड, संदीप शंकर पवार (तिघेही रा.घोडेगाव,नेवासा)त्यांच्याकडून जबरी चोरी, दरोडा व घरफोडीचे साहित्य त्यात लोखंडी कटावनी, लोखंडी सुरा, लोखंडी रॉड, मिरचीपूड, बॅटरी, आदी जप्त करण्यात आले आहे.ही कारवई सोनई पोलीस ठाण्याचे स.पो.नि.जनार्दन सोनवणे,स.पो.नि.ज्ञानेश्वर थोरात,पो.हे.कॉ.शिवाजी माने,दत्तात्रय गावडे,बाबा वाघमोडे,किरण गायकवाड, भगवान पालवे, विशाल थोरात विठ्ठल थोरात,सोमनाथ झांबरे, वैभव झिने,मृत्यूंजय मोरे,सचिन ठोंबरे,अमोल भांड,श्री आघाव यांनी केली.