Sonai : रस्तालूट करणारे अट्टल गुन्हेगार पाठलाग करून जेरबंद ; सोनई पोलिसांची कारवाई


साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 एप्रिल 2020
नेवासा |  नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव परिसरात रस्ता लूट करणाऱ्या दोघांना सोनई पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

              11 मार्च रोजी सपडू तुकाराम सपकाळ क्रूझर गाडी (सिल्लोड औ.बाद) याला घोडेगाव परिसरात तीन दुचाकीस्वारांनी दमदाटी मारहाण करत लुटले होते.  9 हजार  रुपये  रोख रक्कम व  मोबाईल चोरून नेले होते. याप्रकरणी नितीन मोहन राशिनकर (वय 26 रा कारेगाव ता नेवासा) मुक्तेश्वर उर्फ बाली कैलास ठाकर (वय 22 रा रांजणगाव देवीचे ता नेवासा) यांना पोलिसांनी पकडून अटक केले आहे व त्यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व एक मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

        सदर कारवाई सोनई पोलीस स्टेशनचे स.पो.नि.जनार्दन सोनवणे ज्ञानेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.दत्तात्रय गावडे,शिवाजी माने,विठ्ठल थोरात,गणेश आढागळे,व बाबा वाघमोडे यांनी केली आहे

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post