साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 एप्रिल 2020
श्रीरामपूर | प्रतिनिधी | महाराष्ट्रात केसरी रेशन कार्डधारकांना अनेक वर्षापासून धान्य व जीवनावश्यक वस्तू मिळत नव्हत्या. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता जगात भारतामध्ये कोरोना विषानूने थैमान घातले आहे. यात अनेकांचा बळी गेला व लाखो उपचार घेत आहेत. अशा या महामारीच्या परिस्थितीवर नियंत्रण व प्रतिबंद करण्यसाठी २२ मार्च पासून महाराष्ट्र मध्ये लॉक डाऊन लागू केल्याने गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे. सर्व व्यवसाय धंदे, उद्योग बंद असल्याने गोर- गरीब मध्यमवर्गीय लोकांची परिस्थिती बिकट व हलाखीची होत असतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वकांशी निर्णय घेऊन 1 मेपासून केसरी कार्डधारकांना एका व्यक्तीला 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ ८रु किलो प्रमाणे गहू व १२ रु किलो तांदूळ या प्रमाणे रेशनवर देण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील केसरी रेशनकार्ड धारकांना धान्य वितरित करताना सर्कल व तलाठी यांचे मार्फत धान्य वाटप करावे, त्यामुळे कार्डधारकांची गैरसोय होणार नाही व कार्डधारकांना या धान्याचा लाभ घेता येईल.
हे धान्य थममशीनवर नसून ऑफलाईन आहे. बिलबुकवर पावती देऊन वाटप करण्यात येणार आहे. श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब केसरी कार्डधारकांनी रेशन दुकानदाराकडून आपल्या हक्काचे धान्याचा लाभ घ्यावा किंवा जर केसरी कार्डधारक यांमधील काही मध्यमवर्गीय श्रीमंत ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा लोकांना रेशनवरील धान्य घ्यावयाचे नसल्यास त्यांनी आपल्या रेशनवरील धान्य गोरगरीब गरजू लोकांना केसरी कार्डधारकांच्या किमती प्रमाणे देण्यात यावे अन्यथा तुमच्या केसरी कार्ड वरील तुमच्या हक्काचे धान्याचा दुरुपयोग होईल किंवा रेशन दुकानदाराकडे ते धान्य तसेच शिल्लक राहील. म्हणून अशा गंभीर परिस्थितीमध्ये सर्व स्तरातील केसरी कार्ड धारकांनी धान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठल गोराणे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष-आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ यांच्या वतीने करण्यात येत आहे.