साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 एप्रिल 2020
सोनई (दादा दरंदले) कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे स्वच्छता व सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. रस्त्यावर पोलीस नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. त्याच पोलिसांची सुरक्षितता जपली जावी या हेतूने घोडेगाव येथे प्रशांतभाऊ गडाख यांच्या प्रेरणेने घोडेगाव येथील युवक कार्यकर्त्यांकडून सामाजिक भान जपत ना शंकरराव पाटील गडाख सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सोनई पोलीस ठाणे चे स पो नि जनार्दन सोनवणे व पोलिस कर्मचारी यांना सॅनिटायझर व मास्क भेट देण्यात आले आहे.
या उपक्रमाबद्दल प्रतिष्ठानचे कौतुक होत आहे. यावेळी उपस्थित प्रतिष्ठाणचे महावीर नहार,सुहास गोंटे,शरद सोनवणे,अशोक खाडे, विष्णू चौधरी,दादा दरंदले आदी उपस्थित होते.