Sonai : सोनईच्या कॉलेज ऑफ फार्मसीचा स्टडी फ्रॉम होम उपक्रम ; औषधनिर्माण क्षेत्रातील विदयार्थ्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून राबवला उपक्रम...

साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 एप्रिल 2020
सोनई (दादा दरंदले) आज देशभरात कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात  देशातील  सर्वच महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे फार्मसी सारख्या महत्वाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमास असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रशांत गडाख अध्यक्ष मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी कॉलेज सोनईने विद्यार्थ्यांच्या सराव परिक्षा ऑनलाईन घेण्याचा उपक्रम सुरू केला तसेच विविध प्रकारच्या ऑनलाईन मोड्यूल्सचा योग्य प्रकारे वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 


        यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या अनुसरून माहिती देणे, बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेद्वारे सराव चाचणी परीक्षा घेणे, शैक्षणिक व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करणे, प्रश्ननांची उत्तरे आणि विद्यार्थ्यांचे समाधान करणे व त्यांचे मनोधैर्य वाढविणे यासह त्याच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणे आदी बाबींचा या उपक्रमात समावेश आहे.ऑनलाईन अभ्यासाला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुगल क्लासरुम, गुगल फॉर्म, पॉवर पॉइंट, कॉलेजच्या युट्यूब व्हिडियो, झुम मीटिंग व ऑनलाईन टेस्ट सीरीज सारख्या विविध अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून  विद्यार्थ्याकडून अभ्यास करुन घेतला जात आहे.

           प्रचलित खडू आणि फळा याऐवजी ऑनलाइन पद्धतीस विद्यार्थी व त्यांच्या पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. महाविद्यालयामार्फत विद्यार्थाचे  व्हॉट्सअप ग्रुप तयार केले असून त्याद्वारे माहितीचे आदान-प्रदान करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण सुरू आहे. यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी त्यांच्या संबंधित विषयाचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ क्लिपची निर्मिती केली असून ते महाविद्यालयाच्या यु टुब लर्निंग चॅनेलवर प्रसारणासाठी पाठविलेली आहे व याची माहिती  व्हाट्सएपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नियमित देण्यात येत आहे.


          महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक देशमुख यांनी सांगितले की सध्या कोरोनामुळे महाविद्यालय बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय, असा प्रश्न होता. मात्र, आमच्या उपक्रमशील आणि तंत्रस्नेही  शिक्षकांनी हा उपक्रम सुरू करून विद्यार्थीचा सहभाग वाढवला आहे. तसेच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सल्ला देताना सांगितले की, आपण जिथे आहात तेथून घरातूनच अभ्यास करा, घराबाहेर पडु नका, सरकारी सुचनांचे काटेकोर  पालन करा,नियमितपणे हात स्वच्छ धुवा त्याचबरोबर  घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्या.तुम्ही काम करत असलेली जागा रोज साफ करा ज्यामुळे विषाणूचा संसर्ग होणार नाही. त्याचबरोबर लॅपटॉप, कॉम्युटर, मोबाईल यांचा साफ करूनच वापर करावा. या  उपक्रमास प्रशांत गडाख अध्यक्ष मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई , उत्तमराव लोंढे सचिव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत व प्राचार्य डॉ. विनायक देशमुख ,उपप्राचार्य डॉ. विलास घावटे यांनी परीक्षा विभाग प्रमुख डॉ. रामदास पांढरे व सर्व प्राध्यापकांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post