Shrirampur : रमजान महिन्याचे पालन आपल्या घरातच करा ; मुफ्ती मोहम्मद रिजवानऊल हसन यांचे आवाहन



साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 एप्रिल 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी ) जगभरात कोरोना रोगाने थैमान घातले असून या पार्श्वभूमीवर पवित्र रमजान महिना शनिवारपासून सुरू होत आहे . जगाची, देशाची आणि राज्याची परिस्थिती पाहता राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्याचे सर्व विधी रोजा, नमाज, तरावीह आपल्या घरात आदा करावेत,  असे आवाहन इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद रिजवानऊल हसन साहब यांनी केले आहे.

        लवकरच सुरू होणाऱ्या रमजान महिन्याबाबत आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,  जगाची आजची परिस्थिती पाहता देशभरातील नव्हे तर जगभरातील सर्व मुस्लीम जनतेला रमजान महिन्याचे पालन आपल्या घरातच करण्याचे आवाहन जगातील सर्व उलेमांनी केले आहे. घरातील लोकांनी आपल्या घरात नमाज अदा करावी, शेजारचे लोक सुद्धा जमा करू नये. 5 पेक्षा जास्त लोक नमाज मध्ये असू नये. घरात जेवढे लोक असतील ते असू शकतात. परंतु आसपासचे लोक जमा करून कुठेही मोठी गर्दी करून किंवा पाच-पंचवीस लोक जमा करून नमाज आदा करण्याचा प्रयत्न करू नये . कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्यांच्यापासून मुक्त राहण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे . त्यामुळे सर्वांनी रमजान महिना आपल्या घरातच साजरा करावा . तरावीहची नमाज ही वाजिब आहे ती आदा केली पाहिजे . त्यासाठी कुरआन शरीफ मधील जेवढे श्लोक (सुरए ) आपल्याला पाठ आहेत त्यांच्या आधारे नमाज आदा करावी . विशेषतः तरुणांनी या गोष्टीचे भान ठेवावे . गल्लीतील माणसे गोळा करून कुठेही गर्दी करू नये . आपल्या वागण्यामुळे इस्लाम धर्म बदनाम होणार नाही याची सर्वांनी पुरेपूर काळजी घ्यावी . आजची परिस्थिती ही खूप भयानक आहे . जगभरातील लोकांना याचे दुःख आहे . अशा वातावरणामध्ये रमजान महिना आपल्याला काढावा लागणार आहे . तरीसुद्धा अल्लाहची मर्जी समजून आपण याबाबत कोणीही जिद्द न करता कायद्याचे पालन करावे . पोलीस, डॉक्टर्स व त्यांचा स्टाफ नागरिकांच्या संरक्षणासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत. त्या सर्वांना आपण सहकार्य करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वतःवर मर्यादा घालून घेऊन नियमांचे पालन करीत कोरोनापासून स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबियांचे रक्षण करावे व अल्लाहच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आपल्या घरात नमाज अदा करावी. समाजातील सर्व प्रमुख व समजूतदार लोकांनी याबाबत जागृती करावी, असे आवाहनही शेवटी त्यांनी केले. 

         रमजान निमित्ताने बाजारात होणारी गर्दी टाळावी. संध्याकाळी खरेदीच्या निमित्ताने कोणी बाहेर पडू नये. दिवसभरात ती खरेदी करून ठेवावी. रस्त्यावर गर्दी करून रोगाला आमंत्रण देऊ नये असेही ते म्हणाले. कोरोना मुळे निर्माण झालेले वातावरण प्रत्येक मुस्लिम बांधवासाठी खूपच क्लेशदायक आहे . याची सर्वांना जाणीव आहे. परंतु तरीही आपल्या भावनांना आवर घालून हा रमजान महिना सर्वांनी आपल्या घरात पाळावा असे आवाहन मुस्लिम समाजातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील प्रमुख सर्वश्री. नगरसेवक हाजी मुजफ्फरभाई शेख, हाजी अंजुमभाई शेख, हाजी जलीलभाई काजी, हाजी साजिद मिर्झा, हाजी आरिफ बागवान, हाजी शरीफभाई पठाण, हाजी ताजमोहम्मद शेख, हाजी याकुब बागवान, हाजी गफार पोपटिया,हाजी याकुब कुरेशी, अॅड  हाजी वाय .के. शेख,हाजी अजीज बागवान,हाजी मुक्तार खान,ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण, हाजी एस के खान,मोहम्मद रफीक शेख, जावेद भाई काजी,मुन्ना भाई पठाण, रज्जाक पठाण, शहानवाज बारुदवाला, अहमदभाई जहागिरदार, अॅड. शफीअहमद शेख, अॅड. कलीम शेख, अॅड. समीन बागवान, अॅड. जावेद शेख, सोहेल बारूदवाला, फिरोज पठाण, डॉ.तोफिक शेख, डॉ. अफरोज तांबोळी, डॉ. सलीम शेख, डॉ.शफी शेख, डॉ.सय्यद मुजाहिद,मेहबूबभाई कुरेशी, निसारभाई कुरेशी, कलीमभाई कुरेशी, मुक्तार शहा, गफूर शाह, युसूफभाई सय्यद, रियाज पेंटर, शकिल बागवान, रियाज बागवान,बाबुभाई कुरेशी आदी मान्यवरांनी केले आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post