साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 एप्रिल 2020
श्रीरामपूर|अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या श्रीरामपूर येथील डॉक्टरांसह सर्वांचे स्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे यांनी 'साईकिरण टाइम्स' ला दिली.
नेवासा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या श्रीरामपूरातील डॉक्टरांसह इतरांचे स्राव अहवाल निगेटिव्ह आल्याने श्रीरामपूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.