Shrirampur | जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, व्यापारी अडून पाहताय ?

साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 एप्रिल 2020

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) एकीकडे प्रशासन जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक पुरवठा असल्याचे सांगत असताना शहराच्या अनेक भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार सुरू असून दुकानदार जादा भावाने वस्तूंची विक्री करीत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होत आहेत. काही व्यापारी आपला माल खपवण्यासाठी वस्तूंसोबत इतर न खपणाऱ्या वस्तू घेण्याची सक्ती करत  आहे.

     साखर, शेंगदाणा, डाळी यांची जादा भावाने विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शहराच्या विविध भागातील दुकानदारांनी दुकानातला माल  संपला असून नवीन माल येत नसल्यामुळे आहे तो माल चढ्या भावाने विकायला सुरुवात केली आहे . याबाबत काही जागरूक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याची ही चर्चा होत आहे. शासन सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व दुधाचा पुरवठा कमी पडणार नसल्याचे वारंवार सांगत आहे. दूध आणि भाजीपाला मिळत असून किराणामालातील अनेक वस्तूंची विक्री चढ्या भावाने होत असल्याच्या तक्रारी शहराच्या सर्वच भागातून येत आहेत. याबाबत प्रशासनाने अशा दुकानांना भेटी देऊन त्यांची तपासणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. शेजारी राहुरी तालुक्यातील तहसीलदारांनी अशा अनेक दुकानांना भेटी देऊन जादा भावाने विक्री करणारांना नोटिसा दिल्या आहेत. श्रीरामपूर तालुक्यांमध्ये याबाबत दुर्लक्ष केले जात असल्याचीही चर्चा होत आहे .


मोठे व्यापारी अडून पाहताय? 

शहरातील महावीर परिसरात एक मोठा दुकानदार गायछाप पुडीची विक्री चढ्या भावाने करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे . या दुकानात जाणाऱ्या ग्राहकांना फक्त गायछाप पुडी दिली जात नसून त्यासोबत इतर वस्तू सुद्धा घेण्याची सक्ती केली जात आहे . गाय छाप  पुडीचा दरही वाढवून घेतला जात असल्याची तक्रार असून हा मोठा दुकानदार मोठ्या दिमाखात या वस्तू विकत असल्याचीही चर्चा होत आहे .  चढया भावाने केल्या जाणाऱ्या विक्रीकडे डोळेझाक केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .

शहरातील महावीर पथवरील दुकानात  345 रुपयाच्या गायछाप पुड्याचे डबल पैसे घेतले जात आहेत. त्यासोबत इतर कोणत्याही वस्तू बळजबरीने गळ्यात मारल्या जात आहेत. इतर वस्तू नको म्हणल्यास गायछाप घेऊ नका, असे उद्धटपणे उत्तर दिले जात आहे. याबाबत  मी प्रताधिकाऱ्यांकडे तक्रार  करायला गेलो असता  ते  काहीही  ऐकत नाही ; ते  सांगतात की गायछाप ही चैनिच्या वस्तु या सौंज्ञेत येते. आम्हाला फक्त जिवानावश्यक वस्तु या बद्दल तक्रार घेता येते . यावर मी त्यांना,  गायछाप हे चैनिच्या वस्तुमध्ये येते हे आम्हाला सुद्धा कळते पण सदर  दुकानदार हा त्या वस्तुचा स्टोकिस्ट करत  असल्यामुळे असे साठेबाजीनी काळाबाजार करण्याचा अधिकार नाही.  तसेच  एखादी वस्तु बळजबरिने घेण्याची सक्ती का ? फक्त जिवनावश्यक वस्तुच्या विक्रीला  मान्यता दिली आहे तर तो दुकानदार  त्याच्या तंबाखु ,सिगारेट  अश्या वस्तु कसे विकतो आहे ? त्यांना  त्या वस्तुंचा काळाबाजार करण्याचा अधिकार कोणी दिला ? हे काळाबाजार रोखण्याचे  तुम्ही आदेश द्यायला  हवे. 
        - इम्रान पटेल, व्यवसायिक 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post