![]() |
प्रातिनिधीक छायाचित्र |
साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 एप्रिल 2020
वडाळा महादेव | राजेंद्र देसाई | श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील आंबा उत्पादक शेतकरी संकटात असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. वडाळा महादेव येथील अनेक शेतकरी शेती व्यवसायाला जोड धंदा म्हणुन आंबा फळबागापासुन उत्पन्न मिळवतात. या भागात अनेक शेतकऱ्याकडे आंब्याच्या विवीध जाती-प्रजाती असुन गोड रसाचा आंबा तसेच लोणच्यासाठी आंबट आंबा, अशा अनेक प्रकारचे झाडे आहेत. सध्या अवकाळी पावसाने दोन वेळा हजेरी लावण्याने परिसरातील आंब्याचा मोहर गळाला असल्याने शेतकऱ्यांवर काळाची कुऱ्हाड कोसळली आहे.
अनेक संकटांना तोंड देत असताना हे मोठे संकट उद्भवल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत सालाबादाप्रमाणे अक्षय तृतीया सणानिमित्ताने वडाळा महादेव येथील अनेक शेतकरी आंबा विक्रीसाठी सज्ज होत असत. आंब्याचा मोहर गळाला असल्यामुळे अक्षय तृतीया साठी आंबा विक्रीसाठी ठेवता येणार नसल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अनेक वर्षापासून आंब्याच्या झाडाला लहान मुलाप्रमाणे सांभाळले आहे आमच्याकडे विविध प्रकारच्या आंब्याच्या प्रजाती आहेत अवकाळी पावसाने तसेच वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे आंबा झाडावरचा मोहर पूर्णपणे गळाला आहे त्यामुळे भरून न येणारे नुकसान झालेले आहे.
- पांडुरंग जनार्दन पवार, प्रगतशिल शेतकरी (माजी कामगार पोलीस पाटील वडाळा महादेव)
संस्थेच्या सेवेनंतर पारंपारीक शेती व्यवसायाकडे वळालो आमच्याकडे वडिलोपार्जित पारंपारिक शेती व्यवसाय तसेच आंब्याचा बाग चिकू बाग नारळ बाग असे विविध प्रकारचे फळबागा असून आंब्याचे झाडे खूप वर्षांपूर्वीचे आहेत गोड आंबट व रसाचे आंबे उपलब्ध असल्याने परिसरातील ग्राहक आमच्या आंब्याला पसंती देत असतात सध्या वादळी वारे तसेच अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहर पूर्णपणे गळाला आहे त्यामुळे आमचे प्रचंड असे नुकसान झालेले आहे.
_ रमाकांत चिंधु राऊत , निवृत्त शिक्षक( रयत शिक्षण संस्था ) वडाळा महादेव, प्रगतशील शेतकरी.