साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 एप्रिल 2020
श्रीरामपुर (प्रतिनिधि) कोरोना संकटात आमदार कानडेंनी मतदार संघात लक्ष देवुन जनतेच्या अडचनी समजून घेण्यापेक्षा अशोक कारखान्यावर जाऊन चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. गरिबांना सॅनिटायझर भेटाव अस वाटत असेल तर , आमदार निधीतून, स्वतःच्या खिशातून खरेदी करून ते का वाटले नाही? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते भैय्या भिसे यांनी विचारला आहे.
ज्या कार्यकर्त्यांच्या, शेतकरी, व्यापारी वर्गाच्या व गरीब जनतेच्या जीवावर कानडे आमदार झाले त्या मतदारांना अडचणीच्या काळात वाऱ्यावर सोडत आहेत. मतदारसंघात साधा आभार दौरासुद्धा केला नाही. जे लोक निवडणुकीत विरोध करत होते त्यांच्या मांडीला मांडी लावून लहु के दो रंग हे कुटिल राजकारण करण्यात स्वारस्थ मानले असल्याचा आरोप भिसे यांनी केला आहे. जर खरच गरिबांना सॅनिटायझर भेटाव अस वाटत असेल तर , आमदार निधीतून, स्वतःच्या खिशातून खरेदी करून ते का वाटले नाही? असा सवाल भिसे यांनी केला आहे. येत्या काळात तालुक्यातील जनता आमदारांना जाब विचारल्याशिवाय शांत बसणार नाही, असही सामाजिक कार्यकर्ते भिसे यांनी म्हंटले आहे. निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यानी जीवाचं रान करून कानडेंना निवडून आणलं आज ते सोबत नाही हेच कानडेंच्या हेकेखोर स्वभावाच जिवंत उदाहरण आहे का?? असा संतप्त सवाल भिसे यांनी उपस्थित केला आहे.