Shrirampur : मुख्तार उस्मान खान दुःखद निधन


साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 एप्रिल 2020
श्रीरामपूर | प्रतिनिधी | येथील मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलच्या स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष हाजी मुख्तार उस्मान खान ( वय 78 ) यांचे रात्री दीड वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झाले.माजी मंत्री गोविंदराव आदिक यांचे ते निकटचे कार्यकर्ते होते. श्रीरामपूरातील अँग्लो उर्दू हायस्कूलच्या उभारणीमध्ये तसेच जामा मशिदीच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.


            के जी ए उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका महेजबीन खान,टिळकनगर उर्दू शाळेच्या शिक्षिका शिरीन खान तसेच शिर्डी उर्दू शाळेच्या उपाध्यापिका जरीन खान तसेच इंजिनिअर परवेज खान व जिया खान यांचे ते वडील तर ठेकेदार एस के खान,आरटीओ एजंट निजामभाई शेख यांचे ते सासरे होते .त्यांच्यामागे दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज सकाळी कब्रस्तानात त्यांचा दफनविधी पार पडला .मुख्तारभाई यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना इच्छा असूनही त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होता आले नाही .अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद तसेच उर्दू शिक्षक संघटना व मुशायरा कमिटीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post