Shrirampur : डॉक्टरांना डांबून ठेवणाऱ्यांवर कारवाई करा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी


साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 एप्रिल 2020
श्रीरामपूर|श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जमधडे यांना क्वारंटाईनच्या  नावाखाली श्रीरामपूर येथून नगर येथे बाराबाभळी  याठिकाणी  मदरसेत कोणाच्या आदेशाने घेवून गेले व आदेश कोणी काढला व तेथे ठेवण्याचे कारण काय? या सर्व प्रकरणाची स्वतंत्र अधिकारी नेमूण उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी. वैद्यकीय क्षेत्रांना अशा प्रकारे काळीमा फासणार्‍या अधिकार्‍याविरूध्द खातेनिहाय चौकशी करून त्यांना त्वरीत निलंबीत करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. 


              श्रीरामपूर तालुका व  शहरामध्ये अद्याप एकही कोरोनाबाधित  रुग्ण  नाही. शहरांमध्ये खरबदारीचा उपाय म्हणुन श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.वसंत जमधडे यांनी जनतेला वेळोवेळी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी त्याचे गांभीर्य लक्षात घेता लॉकडाउनच्या काळात चांगले सहकार्य देखील केले. आजपर्यंत जे काही संशयीत पेशंट शहरात व ग्रामीण भागात आले होते त्यांच्या घरी जावून त्यांनी स्वत: व त्यांच्या टीमसह रात्र दिवस याचा  विचार न करता चांगली कामगिरी पार पाडली आहे. श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालयाचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये डॉक्टर वसतं जमधडे यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. पुर्वीची ग्रामीण  रूग्णालयाची परिस्थिती बघता आताचे जमधडे हे अधिक्षक म्हणुन नियुक्त झाल्यानंतर ग्रामीण रूग्णालयाची परिस्थिती पूर्णपणे बदली आहे. तसेच सदर ग्रामीण रूग्णालयाला दोन वेळा  कायाकल्प पुरस्कार देखील मिळवून दिला आहे. 

           शहर व आजुबाजुच्या परिसरातील कित्येक नागरिकांना या ग्रामीण रूग्णालयात मोठया प्रमाणात फायदा झाला आहे. डॉ. वसंत जमधडे हे स्वत: स्त्री रोग तज्ञ असल्याने तसेच त्याचा अनुभव देखील चांगला आहे. त्यांच्या मार्गदशर्नाखाली ग्रामीण रूग्णालयात देखील सुसज्ज, प्रशस्त व स्वच्छ असून खाजगी रूग्णालयापेक्षाही चांगल्या पध्दतीचे उपचार दिले जातात. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील गरीब, सर्वसामान्य तसेच उच्चभ्रू देखील या रूग्णालयात उपचारासाठी येतात. विशेष करून गर्भवती स्त्रीयांचा उपचार जास्त प्रमाणात होतो. येथे बर्‍याच महिलांची प्रसुती होवून गोंडस बालकांना जन्म दिला आहे. 

           ग्रामिण रूग्णालय हे स्वच्छतेच्या  मानंकनेमध्ये अवघ्या महाराष्ट्रात दोन वेळा प्रथम क्रमांकाचे ठरले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कायाकल्प योजनेच्या माध्यमातून होणार्‍या शासकीय रूग्णालय सर्वेक्षणामध्ये सलग दोन वेळा राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याचे श्रेय डॉ. वसंत जमधडे व त्यांच्या टिमला जाते. कोरोना  प्रार्दुभाव रोखण्यासाठी जमधडे व त्यांची टिमने अत्यंत प्रभावीपणे कार्य केल्यामुळे शहरात आरोग्य टिकुन राहण्यास मदत झाली आहे. दि. ११/४/२०२० रोजी डॉ. जमधडे हे आपले रूग्ण सेवेचे कार्यकर्तव्य बजावत असताना नेवासा येथील  कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आल्याने त्यांना व त्याच्या सहकारी डॉक्टर व कर्मचार्‍यांना अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालय या ठिकाणी तपासणीसाठी नेले. त्यांचे व त्यांच्यासमवेत सर्वांचे घशातील स्त्राव नमुने  चाचणीसाठी घेण्यात आले. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणुन त्यांच्यासह इतरांना देखील श्रीरामपूर याठिकाणी निरिक्षणाखाली ठेवले होते ; परंतु अचानक २० एप्रिल २०२० रोजी  श्रीरामपूरातील एकूण १३ जनांना  क्वारंटाईन केलेल्या पैकी केवळ डॉ. वसंत जमधडे यांना नगर येथे शासकीय  रूग्णालयात न ठेवता जाणीवपूर्वक बाराभाबळी येथील मदरसेमध्ये क्वारंटाईन  ठेवण्यात आले आहे. डॉ. जमधडे हे ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक असून ते वर्ग १ चे अधिकारी आहेत याचे देखील भान ठेवण्यात आलेले नाही. तसेच मदरसे मध्ये उपचाराच्या नावाखाली त्यांनी मानसिक व शारीरिक पिळवणूक केली जात आहे. अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. सदर परिस्थिती पाहता डॉक्टरांच्या मुलभूत हक्कांची पायमल्ली केली जात असल्याची तक्रार आम्ही करत आहोत. हे असेच सुरू राहीले तर सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती असून शकेल यांचा विचार करणे देखील अशक्य आहे. असेच जर सुरू राहीले तर भावी काळात वैद्यकिय सेवेत काम करणार्‍या डॉक्टर, अधिकारी, परिचारीका  कर्मचार्‍यांची मानसिकता बदलु शकते व त्यांचा शासनावरचा विश्‍वास पूर्णपणे उडेल. डॉ. जमधडे यांनी कोरेंटाईंटच्या नावाखाली श्रीरामपूर येथून नगर येथे बाराबाभळी  याठिकाणी  मदरसेत कोणाच्या आदेशाने घेवून गेले व आदेश कोणी काढला व तेथे ठेवण्याचे कारण काय? या सर्व प्रकरणाची स्वतंत्र अधिकारी नेमूण उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी. वैद्यकीय क्षेत्रांना अशा प्रकारे काळीमा फासणार्‍या अधिकार्‍याविरूध्द खातेनिहाय चौकशी करून त्यांना त्वरीत निलंबीत करावे,  अशी मागणी आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल,  कामगार नेते नागेशभाई सावंत,     नगरसेवक प्रकाश ढोकणे, नगरसेवक मुक्तार शहा, सामाजिक कार्यकर्ता लहानु त्रिभुवन,वंचित बहुजन आघाडी चे चरण त्रिभुवन, मराठा स्वयंसेवक संघाचे राजेंद्र भोसले,आम आदमी पार्टीचे   विकास डेंगळे, सामाजिक कार्यकर्ता रियाज पठाण, मा.नगरसेवक नजीर मुलाणी कॉ. जीवन सुरडे, अमरप्रित सिंग शेठी, सलीम जहागिरदार,सुनिल इंगळे आदींनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. 


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post