Shrirampur : बिबटयाने पुन्हा एकदा उक्कलगावात जगधने वस्तीवर झडप घालून शेळी केली फस्त


साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 एप्रिल 2020
उक्कलगाव | प्रतिनिधी |कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावांत लाॅकडाऊन सुरू असतानाच श्रीरामपूर परिसरातील उक्कलगाव मधील लम्हाणबाबा शिवारातील नवनाथ गडाख यांच्या वस्तीवरील बिबटयाने कुत्रा फस्त केल्याची घटना ताजी असतानाच जगधने वस्तीवर बिबटयाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे.  येथीलच सुनिल दिनकर जगधने यांच्या गायाच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबटयाने झडप घालून नजीकच असणार्‍या मका शेतात बिबटयाने शेळी फरफटत   नेत फस्त केली आहे. दरम्यान, शेतकरी सूनिल जगधने हे यांना काही शेळयाचा गायाचा आवाजाने जाग आल्याने डोळ्यादेखत बिबटयाने गाभण शेळी फडफडत नेत मकाच्या शेतात नेत फस्त केली सदरची घटना बुधवारी रात्री 11 वाजेच्या  सुमारास जगधने वस्तीनजीक घडली.


          दरम्यान, शेळीचा माग काढला असता गुरुवारीच त्यांना व इतर काहीही शेतकर्‍यांना लगेच येथील नजीक असणार्‍या मकात शेतातच बिबटयाने शेळीचे फस्त केलेले अवशेष मिळून आले आहे अवशेष मिळुन आल्याने घडलेली घटना वनअधिकाऱ्यांच्या कानावर घातली. सातत्याने बिबट्याच्या हल्ल्याच्या या  परिसरात घटना घडत आहे वारंवार घटना उघडकीस आल्याने शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहे मागिल दिवसापासूनच लम्हाणबाबा शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असतानाच अद्यापपर्यंत याठिकाणी पिंजरे लावण्यात आलेले नाही सदरचा घडलेला प्रकार वन अधिकाऱ्यांच्या कानावर घातला आहे. संबधीत शेतकर्‍यांची तक्रार लक्षात घेता असता  पंचनामा करण्यासाठी येणार असल्याचे वनअधिकारी लांडे  यांनी शेतकर्‍यांना सांगितले. दरम्यान, गुरुवारी (दि. 23) सायंकाळी वन विभागाचे कर्मचारी लांडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. लम्हाणबाबा परिसर  सह धनवाट परिसर जगधने वस्तीवर नजिक नवीन पिंजरे वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात यावेत अशी मागणी करत असून प्रकाश थोरात, विकास थोरात सुनिल जगधने,मिलिंद जगधने तुकाराम गायकवाड आदी सह शेतकरी उपस्थित होते. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post