श्रीरामपूर|कोरोना संसर्गजन्य आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थिती मुळे सर्वसामान्य गरीब नागरिकांची परवड होत असल्याने कुरणपूरचे उपसरपंच संतोष हळनोर यांच्या पुढाकाराने त्यांनी तातडीने गावातील 40 कुटूंबाना धान्य व किराणा माल स्वखर्चाने वाटप केले. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
उपसरपंच संतोष हाळनोर यांचे सर्वांनी कौतुक केले. कोरोनामुळे गोरगरीब नागरिकांचे हाल होत आहेत. रोजगार नाही. काम नाही. हातात पैसा राहिला नाही. अशावेळी अनेक लोकं आपापल्या परीने गरिबांना मदत करण्यासाठी पुढं येत आहेत.
याप्रसंगी मंडलाधिकारी श्री बोरुडे , तलाठी श्री वायखिंडे, श्री गवारी भाऊसाहेब , ग्रामसेवक श्रीमती पडघलमल , माजी अध्यक्ष लक्ष्मण चिंधे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव हळनोर, मच्छिद्र पारखे ,शामराव चिंधे, योगेश हळनोर, संतोष पारखे ,दीपक बेलकर, शंकर निबे शंकर घोरपडे सुदाम पारखे अमोल महानोर संतोष चिंधे बाळासाहेब पारखे महाराज , राजेंद्र पारखे, तान्हाजी देठे, अजय चितळकर, दत्तात्रय महानोर ,पोपट हळनोर,आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.