साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 एप्रिल 2020
अहमदनगर|जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील मतिमंद असलेल्या 27 वर्षाच्या युवकाचा पुणे येथे ससून रुग्णालयात आज शुक्रवारी सकाळी (दि. 10) उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे यांनी यास दुजोरा दिला. सदर व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत संभ्रम आहे.
'साईकिरण टाइम्स' ने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे यांच्याशी संपर्क केला असता, सदर व्यक्तीच्या वडिलांशी व पुणे येथील ससून रुग्णालयाचे डीन यांच्याशी फोनवर बोलणे झाले असून त्यांनी मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. रुग्णांच्या मृत्यूचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. त्या रुग्णांस इतरही विविध आजारांनी ग्रासले होते. प्रकृतीही खालावली होती, असे डॉ. जमधडे यांनी सांगितले.