एकलहरे:पहिल्या छायाचित्रात ग्रामस्थांना सॅनिटायझरच्या वाटप करतांना व दुसऱ्या छायाचित्रात गावात तसेच वाड्या-वस्त्यावंर हायड्रोजन पेरॉक्साइड औषध फवारणी करण्यात आली.
साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 एप्रिल 2020
टिळकनगर (वार्ताहर) श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली जात आहे. काल गुरुवारी संपूर्ण गावात स्वच्छता व गावातील ग्रामस्थांचे आरोग्य यांचे संरक्षण होण्यासाठी तसेच गावात कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायत हद्दीतील 550 घरांना सॅनिटायझरच्या दोन बॉटल्स वाटप करून संपूर्ण गावात तसेच वाड्या-वस्त्यावंर हायड्रोजन पेरॉक्साइड औषध फवारणी करण्यात आली.
या वेळी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांना स्वच्छतेची महत्व विशद करून संपूर्ण जगभरात चालू असलेल्या कोरोना संसर्ग विषयी घेतल्या जाणार्या उपाययोजना व कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या पासून संरक्षण करण्याच्या उपाययोजना याविषयी माहिती देण्यात आली. तसेच सर्व ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानून दिलेल्या सूचनांचे कडेकोट पालन करू अशी ग्वाही दिली.
यावेळी पत्रकार लालमोहमद जहागीरदार, तंटामुक्तीचे अध्यक्ष सिराज आलम, एकलहरेच्या सरपंच लक्ष्मी उमाप, उपसरपंच रवींद्र भालेराव, माजी उपसरपंच नसिमखातून जहागिरदार, ग्रामपंचायत सदस्य म्हसू काका सुरडकर, राजू पटेल, सुरेश बर्डे, वैशाली मकासरे, कोकिळा अग्रवाल, बेबी रावण निकम, गणेश उमाप, पत्रकार रिजवान जहागीरदार सह ग्रामपंचायत कर्मचारी विश्वास काळे, राजू निकम, आरोग्य सेविका समीना शेख, सौ निकम सह ग्रामस्थ उपस्थित होते.
गावावर कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामस्थांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध आहेत. ग्रामस्थांनी आजारासंदर्भात एकत्र येऊन सामना करण्यासाठी प्रयत्न करावा. सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व घरात राहून सुरक्षित रहावे.
-रवींद्र भालेराव,
उपसरपंच, ग्रामपंचायत एकलहरे