श्रीरामपूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी देशवासियांना 5 एप्रिलला रविवारी रात्री 9 वाजता घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याच्या केलेल्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत श्रीरामपूरसह, जिल्ह्यात, राज्यात व देशात घरोघरी अंगणात, दारात, गॅलरीत, गच्चीवर दिवे प्रज्वलित करण्यात आले.
टॉर्च, मेणबत्ती, पणती, व दिव्यांनी आसमंत उजळून निघाले. यावेळी चारही दिशांना दिव्यांचा झगमगाट पहायला मिळाला. यावेळी 'गो कोरोना गो' अशा घोषणाही देण्यात आले. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
![]() |
ठाणे : युवकांनी दीपप्रज्वलन करून प्रंतप्रधानाच्या आवाहाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. |
टॉर्च, मेणबत्ती, पणती, व दिव्यांनी आसमंत उजळून निघाले. यावेळी चारही दिशांना दिव्यांचा झगमगाट पहायला मिळाला. यावेळी 'गो कोरोना गो' अशा घोषणाही देण्यात आले. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
कोरोनाविरोधात आख्खा देश एकजूट होत सर्वत्र दिव्यांचा झगमगाट पहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 एप्रिलला रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा, असे आवाहन केले होते. या अहवानाला श्रीरामपूरसह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चारीही दिशांना दिव्यांचा झगमगाट झाला. सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील करण्यात येत होत.
![]() |
साईकिरण टाइम्स |