साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 एप्रिल 2020
श्रीरामपूर | विठ्ठल गोराणे | शासनाने जाहीर केलेल्या लाॅकडाउनला दिव्यांग व्यक्ती घरी राहून उत्तम प्रतिसाद देत आहे.परंतू अगोदरच आर्थिक विवंचनेत असलेली व संजय गांधी निराधार योजनेचे दोन महिने प्रलंबित असलेले मानधन यांमूळे संसाररूपी गाडा चालविणे कठीण झालेले असतांना श्रीरामपूर येथील अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना कौटूंबिक आधारासाठी पुढे सरसावली आहे.
अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे व सचिव वर्षा गायकवाड यांनी निराधार अकरा दिव्यांग कूटूंबांना एक महिना पूरेल इतका किराणा माल घरपोहोच केला. यांबरोबरच प्रशासनाची मिळवून देण्याकरिता अहोरात्र सोशल मिडिया,निवेदन आपत्तकालीन दिव्यांग कक्षाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत.
श्रीरामपूर नगरपरिषदेला दि.२६ मार्च रोजी निवेदन व पाठपूरावा मा.अनूराधा आदिक यांनी तातडीने निर्णय घेत दि.३१ मार्च रोजी श्रीरामपूर शहरातील ४५४ दिव्यांगाच्या खात्यावर १६ लाख २९ हजार वर्ग केले.
भेर्डापूर,दत्तनगर,उंदिरगांव,टाकळीभान,वळदगांव,दिघी येथील ग्रामविकास अधिकारी अनूक्रमे श्री.भालदंड, श्री.धाकतोडे, श्री.हितेश ढूमणे, सौ.शेटे व सौ.सूवर्णा भोंगळ यांच्याशी तसेच दत्तनगर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिल शिरसाठ, उपसरपंच प्रेमचंद कूंकलोळ यांनी दिव्यांग कुटुंबाना मोफत किराणा व प्रत्येकी रू २००० निधी मंगळवार दि.७ एप्रिल रोजी देण्याचे निश्चित केले आहे.
यांबरोबरच पूणे जिल्हा परिषदेने प्रत्येक दिव्यांगाकरिता शरद भोजन योजना अंमलात आणली आहे.त्याच धर्तीवर अहमदनगर जिल्हा परिषदेने योजना राबवावी यांकरिता पाठपूरावा सूरू आहे. याकामी आपत्तकालीन परिस्थितीमध्ये जिल्हातील तीनही मा.मंत्री महोदय, सर्व लोकप्रतिनीधी ,जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष व समाज कल्याण सभापती यांनी स्वारस्य दाखविणे आवश्यक आहे.
अहमदनगर जिल्हातील सर्वच ग्रामपंचायती,नगरपरिषद व नगरपंचायत यांनी तातडीने दिव्यांग ५% निधी वितरित करावा व दिव्यांगाचे जीवन सूकर बनवावे असे आवाहन आसान दिव्यांग संघटनेचे संस्थापक संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड,उपाध्यक्ष मूश्ताकभाई तांबोळी,जिल्हाध्यक्ष सूनिल कानडे,डाॅ.सतिष भट्टड,डाॅ.अनिल दूबे,महिला आघाडी सौ.स्नेहा कूलकर्णी,सौ.विमल जाधव,सौ.साधना चूडिवाल,नवनाथ कर्डिले,प्रेरणा ठाणगे,तालूकाध्यक्ष विश्वास काळे यांनी केले आहे.