साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 एप्रिल 2020
बेलापूर|श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे जागृती प्रतिष्ठान व सार्वजनिक जागृती वाचनालय यांच्यामार्फत अध्यक्ष बाबा साहेब शेलार यांचे हस्ते 100 (शंभर) मास्कचे वाटप करण्यात आले.
मराठी शाळा परिसरातील कष्टकरी, शेतमजूर महिलांना व लहान मुलांना या मास्क चे वाटप सोशल डिस्टंसिंग ठेवून करण्यात आले. कोरोना पासून बचावासाठी सर्वांनी घरी थांबणे गरजेचे आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी पत्रकार अशोक शेलार, पप्पू शेलार , सचिन कांबळे प्रवीण थोरात इत्यादी कार्यकर्ते परिसरातील महिला व मुले उपस्थित होते.