साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 एप्रिल 2020
अहमदनगर|अहमदनगरमध्ये आणखी तीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप मुरंबीकर यांनी ही माहिती दिली.
या तीन रुग्णांपैकी दोन जण आलमगीर (ता.नगर) व एक जण नगर शहरातील सर्जेपुरा या भागातील आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २४ झाली आहे. दरम्यान, 2 रुग्ण यापूर्वी यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.