F
साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 एप्रिल 2020
श्रीरामपूर|श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्यावतीने शहरात जवळपास साडेचार हजार गरजू कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.यामध्ये नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मोलाचा वाटा उचला आहे.
गेल्या महिनाभरापासून कोरोना आजाराने थैमान घातले आहे सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. रोज मोल मजुरी करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य माणूस मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्रीरामपुरात अनेक मदतीचे हात पुढे आले आहे. स्व.ससाणे साहेबांनी आपल्या तीस वर्षाच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे आणि आजच्या या भयानक परिस्थितीत सर्वसामान्य माणूस अडचणीत आल्याने स्व.ससाणे साहेब मित्र मंडळातील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने जवळपास साडेचार हजार कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले आहे.
ना फोटो, ना जाहिरात फक्त गरजूंना मदत हीच भावना
श्रीरामपूर शहरात स्व.ससाणे साहेब मित्र मंडळाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून मदत कार्य चालू आहे याचे कुठेही फोटो नाही आणि जाहिरात नाही. गाजावाजा न करता शासकीय नियमांचे पालन करुन गरजूंना मदत कार्य करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा अडचणीच्या वेळी स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळ मदतीसाठी धावून आले आहे.
यामध्ये उपनगराध्यक्ष करण ससाणे, जेष्ठ नेते जी.के.पाटील, माजी सभापती सचिन गुजर, मा.नगराध्यक्ष अनिल कांबळे, पक्षप्रतोत संजय फ़ंड,जेष्ठ नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, माजी सभापती बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, माऊली प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर मुरकुटे, नगरसेवक दिलीप नागरे, मुजफ्फर शेख, मनोज लबडे, नगरसेविका भारतीताई परदेशी, आशाताई रासकर, मिराताई रोटे, माजी नगरसेवक आशिष धनवटे, दिलीप सानप, कैलास दुबैया, संतोष परदेशी, लैबक ग्रुपचे शाहिदभाई कुरेशी, मुन्नाभाई पठाण, अहमदभाई जहागीरदार, मेहेबूब कुरेशी, साजीद मिर्झा, युनूस पटेल, जफर कुरेशी, फिरोज खान आदींनी मोलाचे योगदान देऊन या सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे.