Shrirampur : भि.रा. खटोड कन्या विद्यालयात शालेय पोषण आहाराचे वाटप



साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 एप्रिल 2020
श्रीरामपूर | विठ्ठल गोराणे | भि.रा. खटोड कन्या विद्यालय श्रीरामपूर येथे दिनांक २७ ते ३० एप्रिल, इयत्ता ५ वी ते ८ वी वर्गासाठी साठी शासनाच्या नियमाप्रमाणे (तांदूळ व धान्य वाटप ) शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात  आले.

          कोरोना या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्व नियमांचे पालन करून अतिशय चांगल्या पद्धतीने सोशल डिस्टंसिंगचे पालन करून भि.रा. खटोड कन्या विद्यालयात  शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.

       याप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव श्री संजय जोशी, विद्यालयाचे चेअरमन श्री अशोक उपाध्ये, विद्यालयाच्या प्राचार्य सौ चित्रा कडू मॅडम, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री आर व्ही कुलकर्णी सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री वसंत मोरे सर,  पर्यवेक्षिका सौ विद्या कुलकर्णी मॅडम, शिक्षक प्रतिनिधी श्री नवनाथ जंगले सर जंगले सर  विद्यालयाचे सर्व शिक्षक,  सेवक वृंद, महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post