साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 एप्रिल 2020
अहमदनगर|जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेले १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर अजून ५४ अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, कोरोना बाधीत ०२ रुग्णांचे १४ दिवसानंतर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज (दि.22) बूथ हॉस्पीटल मधून डिस्चार्ज दिला जाणार आहे. यात आलमगीर येथील एक आणि सर्जेपूरा (नगर) येथील एका रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. या दोन्ही बाधितांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
याशिवाय, इतर निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती या जामखेड, नगर, नेवासा, कोपरगाव, पारनेर येथील असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १४०९ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १३१० व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत. ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. अजून ५४ अहवालाची प्रतीक्षा आहे. तर काही अहवाल प्रयोगशाळेने फेटाळून लावले होते.