Shrirampur | उक्कलगावात स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदूळ वाटप सुरू; सोशल डिस्टन्सींगचे पालन

उक्कलगाव : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील उक्कलगाव मधील कार्डधारकांना प्रति व्यक्तीला पाच किलो मोफत तांदूळ वाटप करतांना श्रीरामपूर पं स माजी सभापती आबासाहेब थोरात, ग्रामपंचायत सदस्य रमेश धनवटे,पुंडलिक तांबे,धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई आदीं दिसत आहे.( छाया : भरत थोरात,  उक्कलगाव )
साईकिरण टाइम्स ब्युरो, 12 एप्रिल 2020
उक्कलगाव (वार्ताहर) पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत  मोफत धान्य वितरण पुरवठा अंत्योदय प्राधान्य पात्र कुटूंब लाभार्थ्यांना रविवार पासुन श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदूळ वाटप सुरू करण्यात आले आहे. 

           पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील उक्कलगाव मधील स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदूळ वाटप सुरू करण्यात आले असून प्रति व्यक्तीला पाच किलो मोफत तांदूळ वाटप सुरू करण्यात आले आहे.पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत तालुक्यातील उक्कलगाव स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदूळाचे वाटप श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी सभापती आबासाहेब थोरात,ग्रामपंचायत सदस्य रमेश धनवटे,पुंडलिक तांबे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई,यांच्या हस्ते व आदींसह प्रमुख उपस्थितीत वाटप सुरू करण्यात आले. स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपाची शिस्त व उपाययोजना आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात येत आहे.12 एप्रिल पासून स्वस्त धान्य दुकानामधुन कोरोना व्हायरस या पार्श्वभूमीवर सर्व धान्य दुकानातील येणार्‍या प्रत्येक   ग्राहकांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय प्राधान्य पात्र कुटूंबाला लाभार्थी त्यांच्या करिता प्रत्येक व्यक्तीला पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात येत असून कार्ड धारकांनी सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडुन सांगण्यात आले. दरम्यान या योजनेचा श्रीरामपुर शहरासह तालुक्यातील उक्कलगाव मधील नागरिकांनी मोफत तांदूळ वाटप सुरू झाले आहे नियमित धान्य नेणाऱ्यानांच या योजनेचा लाभ घेता येणार आहे केशरी कार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे कोरोनाच्या संकट काळात धान्य दुकानदार जीवावर उदार होऊन धान्य वाटप करत आहे माणसाप्रमाणे म्हणूनच आपणही त्यांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहनही स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी केले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post