साईकिरण टाइम्स ब्युरो, 13 एप्रिल 2020
घोडेगाव (दादा दरंदले) नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी देवी यात्रा कमिटीच्या वतीने चैत्रपंचमी यात्रा उत्सव सोहळा 12 एप्रिल रोजी पार पडला मात्र पहिल्यांदाच इतिहासात हा सोहळा भाविकांविना पार पडला आहे.
कोरोना व्हायरसचे संकट देशावर आले आहे. यामुळे सरकारने या संकटाशी लढा देण्यासाठी कडक धोरण अवलंबवीले आहेत. या धोरणाचा भाग म्हणून देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच संचारबंदीचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी मंदिर बंद करण्यात आले असले तरी श्री घोडेश्वरी मातेचे नित्योपचार सुरू आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्याने मंदिर प्रशासनास वरिष्ठांकडून आदेश येईपर्यंत मंदिर बंदचा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या व अनेक भावीक भक्तांचे कुलदैवत असलेल्या श्री घोडेश्वरी मातेच्या दर्शनास व चैत्रपंचमी यात्रा उत्सवाच्या सोहळ्यासाठी भाविक भक्तांना येता आले नाही.
श्री घोडेश्वरी देवी मंदिरात नेहमीच भक्ताची गर्दी असते.आज पर्यंत च्या इतिहासात कधी मंदिर बंद ठेवण्यात आले नाही. परंतु कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत प्रशासनातील वरिष्ठांच्या आदेशाने श्री घोडेश्वरी देवी मंदिर यात्रा उत्सव काळात पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे
- श्री शरद नारायण सोनवणे
(श्री घोडेश्वरी देवी यात्रा कमिटी अध्यक्ष)
दरवषी चैत्रपंचमी यात्रा उत्सव भक्तांच्या अलोट गर्दीने फुलून दिसत होता मात्र या वर्षी कोरोना व्हायरस मुळे घोडेगाव परिसर मंदिर परिसर व प्रमुख रस्ते मोकळे असल्याचे दिसून आले. असे असले तरी चैत्रपंचमी यात्रा श्री घोडेश्वरी देवी यात्रा कमिटी ने अभिषेक करून मातेची पूजा.चैत्रपंचमी यात्राउत्सवात पुजाऱ्याच्या हस्ते नियमित विधिवत पूजा सोशल डिस्टनस चे नियम पाळून करण्यात आली. त्यावेळी सोनई पोलिस स्टेशन चे स.पो.नि.जनार्दन सोनवणे साहेब पो.हे.कॉ. किरणकुमार गायकवाड,विठ्ठल थोरात आर.एस.पी चे सिकंदर शेख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.