साईकिरण टाइम्स ब्युरो, 22एप्रिल 2020
श्रीरामपूर|श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील स्व. गोरक्षनाथ सखाराम पाटील लांडे (केंद्रप्रमुख) यांचे चिरंजीव किरणकुमार गोरक्षनाथ लांडे यांची जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता पदी नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांच्या निवडीबद्दल बाबासाहेब किसन राशिनकर पाटील (मा. विस्तार अधिकारी) व नायगाव गावचे पोलीस पाटील श्री राजेंद्र भाऊसाहेब राशिनकर पाटील परिवाराकडून कौतुक व अभिनंदन केले आहे.
किरणकुमार लांडे हे सद्गुरु श्री योगीराज गंगागिरी महाराज संस्थान सरला बेटाशी जोडलेले आहेत. नायगाव गावातील धार्मिक कार्यक्रमातही प्रथमता उपस्थिती असते. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. या निवडीबद्दल नायगाव जाफराबाद नाऊर विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.