Shrirampur : मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत मयुरेश शुक्रेचे सुयश

मयुरेश मंदार शुक्रे  
साईकिरण टाइम्स ब्युरो, 28 एप्रिल 2020
श्रीरामपूर | राजेंद्र देसाई |जानेवारी २०२०मध्ये घेण्यात आलेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत श्रीरामपूर येथील दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी चि.मयुरेश मंदार शुक्रे हा १५०पैकी१२२गुण मिळवून केंद्रात ७वा, जिल्ह्यात १५वा क्रमांक मिळवून गुणवत्ता यादीत आला.

         याप्रसंगी त्याचे हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव श्री.संजय जोशी, शाळेचे चेअरमन श्री.राजेंद्र जोशी, मुख्याध्यापक श्री.भि.स.कांबळे, सर्व स्कूल कमेटी सदस्य, शिक्षक, पदाधिकारी, पालकांनी अभिनंदन केले. चि.मयुरेश याला वर्गशिक्षक श्री.दत्तात्रय आबुज यांचे मार्गदर्शन लाभले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post