![]() |
चि. अथर्व रामनाथ गाडेकर |
साईकिरण टाइम्स ब्युरो, 28 एप्रिल 2020
श्रीरामपूर | मंथन पब्लिकेशनतर्फे घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत, येथील नगरपालिका शाळा क्रमांक सातचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी चि. अथर्व रामनाथ गाडेकर याने प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत केंद्रात 11 वा क्रमांक पटकावला आहे. तर जिल्ह्यात 28 व राज्यात 30 वा क्रमांक मिळवला आहे. त्याला प्रज्ञाशोध परीक्षेत 300 पैकी 242 गुण प्राप्त झाले. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
चि. अथर्व याला वर्ग शिक्षिका सौ जयकर मॅडम व शाळा क्रमांक 7 च्या इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री पटारे साहेब यांनी अभिनंदन केले.