साईकिरण टाइम्स स्ट्रोक
साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 एप्रिल 2020
श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये 3 दिवसांपासून पैसे शिल्लक नसल्याने परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे वृत्त काल ( दि.3) 'साईकिरण टाइम्स' डिजिटल वेबन्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. सोशल मीडियावरही हे वृत्त शेअर झाले होते. दरम्यान, बँक प्रशासनाने या वृत्ताची तातडीने दखल घेत आज (दि. 4)सकाळी खाजगी कॅश लेंडीग करण्याऱ्या कंपनीस पाचारण करत कॅश लेंडीग करुन घेतले. रविवार व सोमवारी सुट्टी असल्याने ग्राहकांनी बँकेत गर्दी केली होती.
Related News -
https://www.saikirantimes.in/2020/04/shrirampur-3.html?m=1
उक्कलगावपासून 3 किलोमीटर अंतरावर बेलापूर येथे एटीएम आहेत ; परंतु लाॅकडाऊन असल्यामूळे बेलापूराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. उक्कलगावात 3 दिवसांपासून सेंट्रल बँकेच्या एटीएम मध्ये पैसे नव्हते ; तसा पैसे शिल्लक नसल्याचा बोर्डही बँकेसमोर लावण्यात आला होता. नागरिकांचे प्रचंड हाल होत होते.
विशेष म्हणजे उक्कलगाव, गळनिंब, कडीत, मांडवे, कुरणपूर, बेलापूर आदीं गावातील खातेदार या सेंट्रल बँकेच्या शाखेशी संलग्न असलेल्यामूळे बॅक व एटीएम सेवा केद्रांशी पैशाचे व्यवहार होत असतात. उक्कलगावपासून तीन किलोमीटर अंतरावर बेलापूर येथे एटीएम आहे तसेच कोल्हार येथे दहा किलोमीटर अंतरावर एटीएम मशीन आहे ; परंतू लाॅकडाऊन असल्यामूळे बेलापूराकडे जाणाऱ्यासाठी रस्ता बंद असल्याने पैशासाठी नागरिकांचे हाल होत होते. एटिएम मध्ये कॅश जमा केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.