Shrirampur : वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना त्रास देणाऱ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करा ; आपचे डुंगरवाल यांनी गृह राज्यमंत्र्यांकडे केली मागणी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 एप्रिल 2020
श्रीरामपूर : विषाणूने बाधित असलेल्या संशयितांना उत्तम आरोग्य व्यवस्था पुरवण्याचे कार्य करणाऱ्या डॉक्टरांना, त्यांच्यासोबत असलेल्या परिचारिकांना,  पोलीस सफाई कर्मचारी यांना वेगवेगळ्या ठिकाणी आटकाव करून त्यांना मारहाण केली जात आहे. मारहाण करणाऱ्या गुंडांविरुद्ध   स्पेशल मोका कायद्यान्वये कारवाई करून अशा घटना पुन्हा घडणार नाही म्हणून पोलीस प्रशासनाने त्वरित कायदेशीर कारवाई करावी या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे वकीलपत्र घेऊ नये , अशी मागणी आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल यांनी गृह राज्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. 


        कुटुंबाची कसलीही परवा न करता वैद्यकीय अधिकारी परिचारिका सफाई कामगार पोलीस प्रशासन हे आपला जीव धोक्यात घालून करोना होऊ नये म्हणून अहो रात्र कष्ट घेताना दिसत आहे. या रोगाची बाधा होऊ नये म्हणून संशयतींना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून  संशयित म्हणून त्यांना होम क्वाँरानटाईन मध्ये पाठवले जाते. विषाणूची बाधा इतरांना होऊ नये म्हणून हे कार्य धाडसाने करीत असताना काही माथेफिरू  त्यांना टार्गेट करून त्यांच्यावरच हल्ले करीत आहे. याविरुद्ध पोलिस विभागाने  त्वरित पावले उचलावीत , अशीही मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.  सर्व अधिकारी कर्मचारी यांनी  यांनी त्यांचे स्वतःचे आरोग्याची काळजी घेऊनच जबाबदारी पार पाडावी, असे  निवेदनात नमूद केले आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post