Pandharpur : श्री विठ्ठल मंदिर समिती कडून गरीब व निराधर लोकांना अन्नदान व मुख्यमंत्री सहायता निधीस 1 कोटी रुपये

साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 एप्रिल 2020
पंढरपूर | दादा दरंदले | जगभर कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात लॉकडाउन केले आहे अशात तीर्थ क्षेत्र पंढरपूर येथे असलेल्या हजारो गरीब,भिक्षुक,वृद्ध,अनाथ,दुर्धर आजाराने ग्रस्त अशा ऐक ना अनेक निराधारांना श्री विठ्ठल मंदिर समिती कडून सकाळ व संध्याकाळी अन्नदान वाटप कण्याचे काम मंदिर समितीने हाती घेतले आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी एक कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे, श्री  विठ्ठल मंदिर समितीचे  कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी यांनी साईकिरण टाइम्सचे प्रतिनिधी दादा दरंदले यांना सांगितले.

   श्री विठ्ठल मंदिर समिती कडून पंढरपूर येथील गरीब गरजू व निराधार व्यक्तींना सकाळी 10 वाजता व संध्याकाळी 6 वाजता 900 ते 1000 लोकांना अन्नदान देण्यात येत आहे. क्षेत्र पंढरपूर येथे भिक्षा मागून दैनंदिन मिळेल ते काम करून व मिळेल ते अन्न खावून हे लोक आपले जीवन जगात असतात त्यात जगावर असलेले कोरोना रोगाचे सावट पाहता महाद्वार,बस स्थानक,रेल्वे स्टेशन,दत्त घाट,बाजार पेठ,चंद्रभागा परिसर व इतरत्र ठिकाणी भिक्षा मागून जगणारे सध्या भिक्षाही मिळत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.कोरोना रोगा मुळे दोन वेळ चे जेवण हि मिळत नसल्याकारणे रॉबिन हूड आर्मी हे देखील या मध्ये सहभागी झाली आहे.श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने नाष्टा व अन्नदान या मध्ये शिरा,उपीट,पोहे,खिचडी,पुरीभाजी,मसालेभात देण्यात येत असून मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी एक कोटी रुपयांचा निधी मंदिर समितीने दिला आहे असे  श्री विठ्ठल मंदिर समितीचे  कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी यांनी साईकिरण टाइम्सचे प्रतिनिधी दादा दरंदले यांना भ्रमणध्वनी वरून संवाद साधला असता सांगितले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post