साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 एप्रिल 2020
श्रीरामपूर | जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले असून याचा प्रादुर्भाव भारतातही मागील एक महिन्यात झालेला आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी योग्य पद्धतीने देशाचे व राज्याचे नियोजन प्राथमिक उपाययोजना चांगल्या प्रकारे आखल्या आहेत त्याची अंमलबजावणी प्रशासन अतिशय काळजीपूर्वक करत आहे. प्रशासनाला सहकार्य करण्याचे काम नागरिकांनी करावे. नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन माजी विस्तार आधिकारी बीके राशिनकर यांनी केले आहे.
पोलीस बांधव आरोग्य प्रशासन ग्राम विकास प्रशासन महसूल प्रशासन अहोरात्र आपल्या हितासाठी कार्य करत आहे. आपण प्रशासनाला सहकार्य करावे. मागील काही काळात पोलीस बांधव यांच्यावरती हल्ले करण्यात आलंय आरोग्य सेवा पुरवणाऱ्या बांधव यांच्यावरील हल्ले काही ठिकाणी झालेत ही अतिशय निंदनीय बाब आहे. असे कोणत्याही प्रकारचे कृत्य होणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. अत्यावश्यक सेवांचा लाभ घेत असताना सोशल डिस्टन्सचा वापर हा काळजीपूर्वक करावा. कमीत कमी 20 सेकंद हातही सॅनिटायझरने धुतले पाहिजे या प्राथमिकउपयोजना करून आपले कर्तव्य पार पाडावे. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन माजी विस्तार अाधिकारी बीके राशिनकर यांनी केले आहे. लवकरच आपला भारत देश कोरोनामुक्त होईल कोरोना हरेल देश जिंकेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.