Nevasa : नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीने वडाळ्यातील आरोग्य सेविकांचा सत्कार

वडाळाबहिरोबा : नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीने आरोग्य सेविकेंचा सत्कार करताना संदीप गाडेकर व विनायक दरंदले

साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 एप्रिल 2020
सोनई (विनायक दरंदले) वडाळाबहिरोबा (ता.नेवासा) येथे मागील आठवड्यात यवतमाळला पायी चाललेल्या महिलेची एटीएमच्या आडोशाला सुखरुप प्रसूतीची सेवा दिल्याबद्दल नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. 

     लाॅकडाऊनच्या धाकाने घर जवळ करण्याकरिता वाघोली(पुणे) येथून वागत जि.यवतमाळला पायी जात असताना वडाळाबहिरोबा येथे रस्त्यावरच निर्मला संदीप काळे हीस प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या होत्या. आरोग्य उपकेंद्रातील परिचारिका सोनाली न्यालपेल्ली-पोता व वनीता काळे-नवगिरे यांनी काळजीपूर्वक प्रसूती करुन मायलेकीला एक प्रकारे जिवदान दिले होते.

     या विशेष आरोग्य सेवेबद्दल नेवासा तालुका पत्रकार एकता संघाचे अध्यक्ष संदीप गाडेकर व माजी अध्यक्ष विनायक दरंदले यांच्या हस्ते पुस्तक दिनाचे औचित्य लक्षात घेवून पुस्तक,श्रीफळ व पेनाचा सेट देवून सत्कार करण्यात आला.अन्नदान सेवा देत असलेल्या आधार प्रतिष्ठाण अध्यक्ष जयवंत मोटे यांचा सत्कार करण्यात आला.आरोग्य सेवक अंजाबापू चेमटे,मदतनीस लिलाबाई वैरागर,राहुल मोटे,सुमीत गिरी,रजनीकांत साळवे,आरोग्य सहायक बाळासाहेब  नवगिरे,आशा सेविका अर्चना गायकवाड,एकताचे सदस्य चंद्रकांत दरंदले, संतोष टेमक,सुधाकर होंडे,प्रविण तिरोडकर उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post