![]() |
साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 एप्रिल 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) कोरोना विरोधात लढणाऱ्या आरोग्य सेवकांमुळे गेल्या महिनाभरापासून सर्व श्रीरामपूरकर घरात सुरक्षित आहेत. अक्षरशः १४ ते १६ तास काम करत एकही दिवस सुट्टी न घेणाऱ्या नगरपालिका आरोग्य विभाग अधिकारी, सुपरवायझर, कचरा संकलन महिला कर्मचाऱ्यांचा जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या संकल्पनेतून संचार बंदी, लॉकडाऊनचा भंग न करता मोरया फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोना कोविड-१९ च्या चिंतेत संपूर्ण देश असताना या लढाईत डॉक्टर्स, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, अत्यावश्यक सेवा कर्मचारी जीवाचे रान करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढत आहेत. श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, मुख्याधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग कर्मचारी अथक परिश्रम करून श्रीरामपूर शहरात उपाययोजना आखून नियोजनरित्या काम करत आहेत. एकीकडे लॉकडाऊन असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोग्य विभाग कर्मचारी अहोरात्र जनतेच्या सेवेत असल्याने त्यांचा सत्कार करत उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी सांगितले.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, लॉक डाऊनच्या नियमांचा भंग न करता उपमुख्याधिकारी प्रकाश जाधव, आरोग्य विभाग प्रमुख संजय आरने, दिशा एजन्सीचे माळी, औषध फवारणी प्रमुख दत्तात्रय चव्हाण, नवनाथ पवार, रणजित सुखदरे, विनायक करोडीवाल, कचरा संकलन गाडी ड्रायव्हर सुनील शेळके, कचरा संकलन महिला सौ.शिरसाठ, सौ.साळवे यांचे नगरसेविका सौ.स्नेहल खोरे, सौ.सारिका लचके यांनी औक्षण केले. तर ज्येष्ठ विधिज्ञ अरुण लबडे, अरुण कुलकर्णी, श्रीराम तरुण मंडळाचे राजेंद्र लचके, शेलार मामा, सचिन कुंभकर्ण, सौ.सारिका लचके, मुख्तार शेख, सचिन लचके, हर्षल गौड आदींनी स्वतःच्या घराच्या दरवाजात, गॅलरीत येऊन आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.