Ghodegaon : घोडेगाव येथील युवकांचा उपक्रम; नगर- औरंगाबाद महामार्गवर ५०० वाटसरूना पुरवले जाते सकाळ संध्याकाळ जेवण


 
साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 एप्रिल 2020
घोडेगाव (दादा दरंदले) लॉकडाऊनमुळे वाहने बंद असल्याने कामानिमित्त शहरात व इतर ठिकाणी स्थायिक झालेली मंडळी घराच्या ओढीने मजल दरमजल करत भर उन्हात आपल्या मुलाबाळासह प्रवास करत आहेत. महामार्गावरील हॉटेल बंद असल्याने व जवळील खाद्य पदार्थ संपल्याने या मंडळींची जेवणाची व पिण्याची पाण्याची गैरसोय होत आहे. ही गरज लक्षात घेऊन घोडेगाव ता नेवासा  येथील आनंद जैन युवक मंडळ घोडेगाव यांचे वतीने सकाळ, संध्याकाळ घोडेगाव ते बायजाबाई जेऊर व घोडेगाव ते  प्रवरासंगम या 70 किमी अंतरावरील महामार्गावर दररोज 500 वाटसरूना जेवणाचे पॉकेट तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोटारसायकल वर जात योग्य ती स्वच्छतेची काळजी घेत वाटप करत आहेत.यात प्रत्येकी 3 पोळ्या, एक भाजी व पुलाव यांचा समावेश असतो.

            विशेष म्हणजे आनंद जैन युवक मंडळाचे सर्व तरुण त्यांच्या पत्नी,मुले सर्व एकत्र येत हे पदार्थ बनवत खादयपदार्थ पॉकेट तयार करत आहेत.व्यापार एके व्यापार करणारे आम्ही मंडळी परंतु आज आपले बांधव अडचणीत असताना आपण आपले कर्तव्य निभावले पाहिजे या भावनेतून आम्ही हे काम करत आहोत व येथूनपुढेही लॉकडाऊन संपेपर्यंत हे काम करणार आहोत असे आनंद जैन युवक मंडळ घोडेगावच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. या सर्व कामात महावीर नहार,वैभव नहार,सचिन चोरडिया,ऍड.पारस नहार,अमोल पटवा, अजय नहार, मयूर नहार,आनंद चोरडिया,कमलेश नहार,राजू चोरडिया,संतोष राठोड,रमण राठोड,संतोष कुवाड, विनोद नहार ,श्रेणीक चोरडिया,रुपेश देसरडा,पियुष चोरडिया  आदींनी सहकुटुंब पुढाकार घेतला आहे.


दैनंदिन व्यापार व व्यवसाय करत गुजराण करणारी आम्ही व्यापारी मंडळी आहोत परंतु सध्या सर्वत्र गोरगरीब नागरिकांची जेवणाची गैरसोय होते आहे त्यात पायी गावाकडे मार्गक्रमण करणाऱ्या मंडळीची तर पुरते हाल आहेत म्हणून आम्ही सर्व आनंद जैन युवक मंडळाचे कार्यकर्ते कर्तव्य भावनेने दररोज सकाळ, संध्याकाळ महामार्गावरील 500 वाटसरूना जेवण पॉकेट देत आहोत व येथुनपुढेही हा उपक्रम आम्ही राबवणार आहोत.
  -- श्री महावीर नहार आनंद जैन युवक मंडळ,  घोडेगाव. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post