Shrirampur : श्रीरामपूरात गरजूंच्या मदतीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांची धडपड

साईकिरण टाइम्स ब्युरो, 20 एप्रिल 2020
श्रीरामपूर | कोरोणा विषाणू संसर्गामुळे देशात सध्या  लॉकडाउन चालू आहे. उद्योगधंदे बंद आहेत ; पर्यायाने ज्यांना काम नाही त्यांची उपासमार होऊ नये म्हणून तसेच ज्यांच्याकडे  घर नसल्याने ( भिक्षेकरी )  उपासमार होते त्यांची उपासमार होऊ नये म्हणून श्रीरामपूरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची  धडपड सुरू आहे. बेघर, भिक्षेकऱ्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अन्नदान  पुरवविले जात आहे. 

       लॉकडाउन  ज्यादिवशी सुरू झाले त्या दिवसपासून स्वतःच्या घरी पोळी भाजी व मसाले भात व लापशी असे पदार्थ तयार करून गरजुंना भोजन देण्याचे काम चालू आहे. भोजन देताना कार्यकर्ताच्या असे लक्षात आले की यामंडळी कडे कोरोणा पासून बचाव कण्यासाठी मास्क नाही म्हणून ते सुध्दा उपलब्ध करून दिले. कार्यकर्त्यांकडून  सकाळी साडेअकरा वाजेच्या  दरम्यान मारुती मंदिर, श्रीराम मंदिर, रेल्वे स्टेशन ते बस स्टँड परिसरात भोजन देण्याचे काम केले जाते. गरजु व बेघर लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे  कार्यकर्तानी कम्युनिटी किचन सुरू केले आहे. 

            भाजपा नेते गणेश राठी, मारुती बिंगले, मनोहर रमनानी, अजित बाबेल,भाजपा युवा मोर्चा चे अक्षय वर्पे, अक्षय नागरे, विशाल यादव, रवि पंडित, अमोल अंबिलवादे, राजेश पाटील, तेजस पाथरकर ,गणेश अभंग, अमित मुत्था आदी असंख्य कार्यकर्ते या व्यवस्थेत हिरीरीने भाग घेत आहेत. त्यांना राजेंद्र कांबळे, संजय जोशी, वैभव लोढा, विजय सेवक , शैलेश खातेकर,हंसराज बत्रा, तसेच राष्ट्रीय सवयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आणि अनेक संघटना मदत करत आहेत. यामध्ये जेष्ठ नेते हेरंब औटी, सुवलाल लुंकड , विष्णुपंत डवरे ,कडुस्कर सर आणि अनेक मान्यवांनी मार्गदर्शन केले. या निमत्ताने कार्यकर्तानी नम्र आवाहन केले आहे की ज्या गरजूंना सरकारने जाहीर करण्यात आलेल्या गहू तांदूळ मिळत नसेल त्यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांशी  संपर्क साधावा त्यांचे समस्याचे निराकरण केले जाईल. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post