Dattanagar : दत्तनगर परिसरात 1 हजार गरजूंना किराणा वाटप

साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 एप्रिल 2020
टिळकनगर (वार्ताहर) देशात व राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 14 एप्रिलपर्यंत असणारा लॉकडाऊन वाढून 3 मे पर्यंत झाला आहे, यामुळे गोरगरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे गरजू, कष्टकरी मजूरवर्गात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिवारासाठी मदत करणे कर्तव्य असल्याने गरजू कुटुंबाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकजाणिवेतून सामाजिक बांधिलकी जपत गरजू व्यक्तींच्या चुली पेटत्या राहाव्या यासाठी  श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे दत्तनगर मित्र मंडळाने मदतीचा हात  देत  परिसरातील डॉ.आंबेडकर वसाहत, फुले आंबेडकर नगर, रमानगर, रेणुका नगर, बेथेल चर्च, टिळकनगर लेबर कॉलनी, या भागातील अत्यंत गरजू 1 हजार कुटुंबाना किराणा वाटप करण्यात आले. यात साखर, रवा, तांदूळ, शेंगदाणे, मीठ, मिरची, चहापावडर आदी  वस्तूंचा समावेश आहे.

         गावच्या मातीसाठी मदतीचा एक हात आधार असल्याचे मत परिसरातील गरजुंनी यावेळी व्यक्त केले. लॉकडाऊनमुळे रोजंदारी करणाऱ्या हातावरचे पोट असणाऱ्या कुटूंबांवरती उपासमारीची वेळ आली असून, त्यांना मदत करणे आमचे कर्तव्ये असल्याने  मंडळा तर्फे सांगितले गेले. तसेच कोरोनाला हरविणे शक्य आहे. विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नका. मास्क वापरा. आपली काळजी आपण स्वत: घेऊया असेही आवाहन यावेळी करण्यात आले. 

         याकामी जि.प. चे माजी अर्थ व बांधकाम  समितीचे सभापती बाबासाहेब दिघे, पंचायत समितीच्या सभापती संगीताताई शिंदे, जि.प. सदस्या आशाताई दिघे, सरपंच सुनील शिरसाठ, उपसरपंच सारिका कुंकलोळ, खादी ग्रामउद्योगचे अध्यक्ष प्रेमचंद कुंकलोळ, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब शिंदे, माजी सरपंच पी. एस. निकम, तंटामुक्तीचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड, टिळकनगर कामगार पतपेढीचे अध्यक्ष बाळासाहेब विघे, आर.पी. आयचे जिल्हाप्रमुख भीमराज बागुल, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, ग्रामपंचायत सदस्य हिरामण जाधव, प्रदीप गायकवाड, किरण खंडागळे, कैलास पगारे, मोहन आव्हाड, सुखदेव जगताप, अरुण वाघमारे, मयुरी बागुल, आम्रपाली विघे, वृषाली कुंकलोळ, शाकेरा बागवान, सोनुबाई लोंढे, राणी खाजेकर, रुपाली बागुल, मालती पठारे, नानासाहेब दांगट, पोलीस पाटील अनिल गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post