Shrirampur : उक्कलगावातील लम्हाणबाबा शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच; कोरोनाची भीती दाखवत वनाधिकारी येईना....अन् ईकडे हल्ले का थांबेना....


साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 एप्रिल 2020
उक्कलगाव|प्रतिनिधी|तालुक्यातील उक्कलगाव शिवारातील लम्हाणबाबा परिसरात गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून बिबटयाचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याचे स्पष्ट झाले असून लम्हाणबाबा परिसरातील जगधने वस्ती नजीकच्या नवनाथ गडाख यांच्या वस्तीवर गुरुवारी रात्रीच्या सुमारास दरवाजाच्या शेजारील कपाटात बसलेला कुत्र्याला बिबट्याने नजीकच्या उसात फडफडत नेत फस्त केले. आवाजाने जाग आल्याने डोळ्यादेखत बिबटयाने कुत्रे नेल्याचा प्रसंग गडाख यांनी पाहिला होता. 



उक्कलगाव | लम्हाणबाबा शिवारात बिबटयाचे ताजे माग उसाच्या शेतात आढळून आले. ( छाया : भरत थोरात )

                  रात्री वेळ असल्याकारणाने सकाळीच त्यांनी बिबटयाचे ताजे माग उसाच्या शेतातून कुत्रे फडफडत नेत असतानाच आढळून आले. कुत्र्याचा माग काढला असता बिबटयाने नदी दिशेने कोल्हार रस्त्याच्या कडेला असलेल्या द्राक्षांच्या बागेच्या नेताना आढळून आले आहे परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने अनेक सातत्याने बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना या वाढल्या आहेत त्यात बिबट्याच्या संख्येत वाढ झाली आहे या लम्हाणबाबा शिवारात बिबट्या असूनच, मादीबिबट्या, पिल्ले,हे देखील आहे नजीकच पिण्यासाठी पाणी,कुत्रे, शेळया,पाळीव प्राणी,लपन, असल्यामुळे या परिसरातून बिबटया जात नाही त्यामुळे या बिबटे कुत्र्यांवर ताव मारत आहे वनविभागाचे अधिकार्‍यांचे शेतकर्‍यांनी लक्ष वेधले असता कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावमूळे  आम्ही घटनास्थळी येऊ शकत नाही तुम्हीच तुमच्या स्वतःची काळजी घ्या रात्री वेळाला घराबाहेर पडू नका असा सल्ला देत त्यांनी कोणतीही कारवाई करण्यास नाकारले वन अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक रहिवासी व शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहे कोपरगाव वनक्षेत्रपाल संतोष जाधव यांच्याशी संपर्क  करत साधून घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला.

धनवाट परिसरात व लम्हाणबाबा शिवारात सातत्याने बिबटयाचा वावर असल्याने याठिकाणी पिंजरे लावण्यात यावेत, तसेच  ज्याठिकाणी बिबटयाचा वावर नसेल ते पिंजरे वावर असल्याठिकाणी लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली असतानाच गळनिंब शिवारात दोन पिंजरे धूळखात पडून आहे.

        लम्हाणबाबा शिवारात अनेक दिवसांपासून पिजंरा लावण्यात यावा मागणी असतांनाच त्यांनीही कोरोनाची भीती दाखवत हात झटकल्याने शेतकरी आणखी संकटात सापडला आहे जर मानवी वस्तीत  बिबटया घुसल्यास मोठा अनर्थ घडल्यास यास जबाबदार कोण? असा उपस्थित सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. 

 सदर बिबटे एक नसून संख्येत वाढ झाली आहे त्यामागे बिबटे व मादी बिबट्या, बछडे असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पाहिले आहे, त्यामुळे हा प्रकार गांभिर्याने घेण्याची गरज आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post