साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 एप्रिल 2020
टिळकनगर (वार्ताहर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती आपण आपल्या घरीच अनोख्या पद्धतीने साजरी करावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी समाजबांधवांनी व कार्यकर्त्यांनी घरीच जयंती साजरी करावी, असे आवाहन भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
सध्या देशात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे अनेक जण मृत्युमुखी पडले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहे. आपण नेहमीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने फटाक्यांच्या अतिषबाजीने व भव्य मिरवणूक, भीम गीत आदी कार्यक्रम घेत असतो ; पण अलीकडच्या काळात कोरोनाचा धोका वाढत आहे. तो संसर्गजन्य असल्यामुळे गर्दीत जास्त पसरतो. त्यामुळे कार्यकर्ते व समाजबांधवांना विनंती आहे की, आपण चौकाचौकात न जमता , घराबाहेर न जाता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच आपल्या कुटुंबासह साजरी करत, 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता दीप प्रज्वलन करून अभिवादन करावे व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस वंदन करून बुद्ध वंदना ग्रहण करून अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करावी, असे मगर यांनी केले आहे.