साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 एप्रिल 2020
बेलापूर|सुहास शेलार|प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या आवाहना नुसार श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे नुकतेच 20 गरीब कुटुंबाना किराणा व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
प्रत्येकाने आपापल्या ईच्छेप्रमाणे गावातील गरीब कुटुंबांना मदत करावी, असे अवाहन प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार पाटील यांनी केले होते ; त्याच्या अवाहनाला प्रतिसाद देत महावितरणचे चेतन जाधव, मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी व पत्रकार देविदास देसाई यांच्या सहयोगातुन २० कुटुंबांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप सरपंच राधाताई बोंबले पोलीस नाईक गणेश भिंगारदे बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांच्या हस्ते करण्यात आले.
मंडलाधीकारी बाबासाहेब गोसावी यांनी गावातील पाच गरीब कुटुंबांना मोफत किराणा देण्याचा निर्णय घेतला. ही बाब महावितरणचे कर्मचारी चेतन जाधव यांना समजताच त्यांनी गरीब कुटुंबाकरीता पाच हजार रुपयांचा किराणा दिला पत्रकार देविदास देसाई यांनीदेखील या उपक्रमात सहभाग नोदविला मंडलाधिकारी गोसावी महावितरणचे कर्मचारी चेतन जाधव पत्रकार देविदास देसाई यांच्या सहकार्यातुन 20 गरीब कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंचे व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. यावेळी मिलींद दुधाळ, पाणी पुरवठा समीतीचे उपाध्यक्ष मनोज श्रीगोड, दिलीप दायमा, मनोज क्षिरसागर, ज्ञानेश्वर भांड, विष्णुपंत डावरे, दिपक क्षत्रिय आदि उपस्थित होते.