श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपरिषदेने पर्यायी यंत्रणा उभी करुण संपूर्ण शहरात औषध व धूर फवारणी मध्ये सातत्य ठेवण्याची मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.समीर शेख यांच्याकडे केली आहे.
सध्या कोरोना आजाराने थैमान घातले आहे अनेक मोठ्या देशांनी यावर हात टेकले आहे. असे असतांना सुदैवाने आपल्या ईकडे परिस्थिती अजून नियंत्रणात आहे त्यामुळे वेळेतच सर्व उपाय योजना होणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीरामपूर शहरात काही भागात फवारणी झाली तर काही भागात आद्यपही फवारणी झालेली नाही त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.
आणि ज्या भागात सुरवातीला फवारणी झाली त्याला देखील बरेच दिवस झाले आहे त्यामुळे फवारणी मध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. पालिकेचे सर्वच अधिकारी कर्मचारी अहोरात्र कष्ट घेतांना दिसत आहे. श्रीरामपूर शहराची व्याप्ती मोठी आहे आणि फवारणी बाबतची यंत्रणा कमी पडत असल्याचे सध्याचे चित्र आहे त्यामुळे संपूर्ण शहरात फवारणीसाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याची मागणी ससाणे यांनी मुख्याधिकारी शेख यांच्या कडे केली आहे.
तसेच आद्यप पर्यंत बाहेर काम करणाऱ्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना विशेषतः कचरा संकलन करणारे कर्मचारी यांना हँड ग्लोज आणि मास्क नाहीत जे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून शहर स्वछ करत आहे याबाबत देखील संबंधित ठेकेदाराला सक्त ताकीद दिली पाहिजे कारण कचरा संकलन करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने मास्क आणि हँड ग्लोज देने बंधनकारक असल्याचे ससाणे यांनी म्हटले आहे.