Shrirampur : उक्कलगावात 3 दिवसांपासून सेंट्रल बँकेच्या एटीएम मध्ये पैसे नाहीत ; नागरिकांचे प्रचंड हाल, रस्तेही बंद

साईकिरण टाइम्स ब्युरो, 3 एप्रिल 2020
श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या  एटीएम मध्ये 3 दिवसांपासून पैसे शिल्लक नसल्याने परिसरातील  नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ऐन लाॅकडाऊनच्या काळात गावात एकच असणारे  एटीएम बंद पडले आहे. उक्कलगावपासून 3 किलोमीटर अंतरावर बेलापूर येथे  एटीएम आहे ; परंतु लाॅकडाऊन असल्यामूळे बेलापूराकडे जाणारा  रस्ताही 
बंद करण्यात आला आहे.  

उक्कलगाव : येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये तीन दिवसांपासून पैसे शिल्लक नाहीत.
         कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले असल्यामूळे संपूर्ण राज्यासह शहरात व गावोगावी शांतता पसरली आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे.  उदरनिर्वाहासाठी पैश्याची गरज पडेल तेव्हा बॅका किंवा एटीएम सेंटरमधुन नागरिक पैसे काढतात. दरम्यान, ऐन लाॅकडाऊनच्या काळात श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावातील सेंट्रल बँकेच्या एटीएम खडखडाट झाला असून येथील बोर्डवर कॅश शिल्लक नाही असे लिहिण्यात आले आहे.

डजबिन,फायरफायटर उक्कलगावमध्ये 
सापडले.... 

       बेलापूरमधील एका बँकेच्या एटीएममधुन बाहेरगाव आलेल्या एका व्यक्तीने डस्टबिन  फायर फायटर, चोरुन आणले व उक्कलगाव येथे टाकले. त्या व्यक्तीला गावातील तरुणाने हटकले असता त्या व्यक्तीकडे हे दोन्ही वस्तू आढळून आल्याने तातडीने बेलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या.
         

    विशेष म्हणजे उक्कलगाव, गळनिंब, कडीत, मांडवे, कुरणपूर, बेलापूर आदीं  गावातील खातेदार या सेंट्रल बँकेच्या शाखेशी संलग्न असलेल्यामूळे बॅक व एटीएम सेवा केद्रांशी पैसे काढण्यासाठी व्यवहार होत असतो. उक्कलगावपासून तीन किलोमीटर अंतरावर बेलापूर येथे  एटीएम आहे तसेच  कोल्हार येथे दहा किलोमीटर अंतरावर एटीएम मशीन आहे ; परंतू लाॅकडाऊन असल्यामूळे बेलापूराकडे जाणाऱ्यासाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. विशेषतःहा तीन दिवसांपासून उक्कलगावचे सेंट्रल बँकेचे एटीएममध्ये खडखडाट आहे. पैसे संपल्यामुळे एटीएम बोर्डवर कॅश शिल्लक नाही असे लिहिण्यात आले. उक्कलगावात एकच राष्ट्रीयकृत बँक आहे. सगळीकडेच बंद असल्यामूळे येणार्‍या- जाणाऱ्यासाठी हे सेंट्रल बँकेचे एटीएम पैसे काढण्यासाठी सोयीस्कर पडते. त्यामुळे कोल्हार,  श्रीरामपूरकडे  येणारे जाणारे लोकं  या एटीएम मशीनचा उपयोग करतात. एटीएस मशीनमध्ये पैसे नसल्याने नागरिकांचे हाल होत असून बेलापूर कडे जाणारे रस्ते बंद आहे. त्यामूळे कामगाराचे पगार करणे मुश्किल झाले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post