साईकिरण टाइम्स ब्युरो, 3 एप्रिल 2020
घोडेगाव | दादा दरंदले | जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या ही वाढत चालली आहे.त्यात सामान्य जनतेला बाहेर कुठे भाजीपाला खरेदीसाठी काही मिळत नाही व बाहेर देखील भाजीविक्रेते नाहीत.यामुळे नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथील माजी सरपंच व नेहमी समाजसेवेसाठी तत्पर असलेले सतीश थोरात यांनी आपल्या स्वखर्चाने टोमॅटो बटाटे कांदा वांगी भेंडी फ्लॉवर कोबी मिरची व कोथिंबीर कारले असे आठ दिवस पुरेल इतका भाजीपाला आपल्या मित्र परिवारांना एकत्र करत गावातील 310 कुटुंबांच्या घरी पोहोच केला.त्यामुळे लोकांना आता पुढील आठ दिवस भाजी साठी कुठ फिरावे लागणार नाही