साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 एप्रिल 2020
श्रीरामपूर | शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये गोंधवनी रस्ता परिसरातील, श्री रामदेवजी बाबा मंदिर येथे सोमवारी ( दि. 27) श्रीरामपूर नगर परिषद, भारतीय जैन संघटना (विशेषतः श्रीरामपूरातील जैन समाज बांधव) व श्रीरामपूर तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित 'डॉक्टर आपल्या दारी' उपक्रमात प्रभागातील विविध आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधे देण्यात आले. या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमात गोंधवणी रोड परिसरातील 370 रूग्णांना मोफत औषध उपचार करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. शहरातील विविध शिबिरात झालेल्या शिबिराच्या तुलनेत आत्ता पर्यंत सर्वात जास्त रूग्णांनी या आरोग्य शिबिरात लाभ घेतला असल्याचे म्हंटले आहे. वेळेअभावी काही रूग्ण माघारी परतले.
या उपक्रमात प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण, श्री रामदेवजी बाबा युवक संघटनेचे भक्तगण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.