Deolali pravra : नगरसेविका सुजाता कदम यांच्याकडुन किराणा किटचे वाटप

साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 एप्रिल 2020
राहुरी फॅक्टरी ( वार्ताहर )कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉग डाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या कराळेवाडी भागातील कुटुंबाना देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या नगरसेविका सुजाता कदम यांच्यावतीने किराणा वाटप करण्यात आले.


       कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉग डाऊन असून गरजु कुटुंबाना कामासाठी घराबाहेर पडणे शक्य नाही त्यामुळे त्यांच्या रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर  बनला आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या नगरसेविका सुजाता कदम यांनी कराळेवाडी भागात व्यक्तीक किराणा किट वाटप केले. या किटचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष व माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सुधाकर कदम, नगरसेविका सुजाता कदम उपस्थित होत्या.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post